शिवरायांचे नाव दिल्लीत गाजवायचेय

By admin | Published: October 17, 2016 01:08 AM2016-10-17T01:08:53+5:302016-10-17T01:08:53+5:30

छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा मनोदय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

Shivrajaya's name is in Delhi | शिवरायांचे नाव दिल्लीत गाजवायचेय

शिवरायांचे नाव दिल्लीत गाजवायचेय

Next


पुणे : राजर्षी शाहूमहाराज यांच्या नावाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्ली येथे वसतिगृह उभारण्याचा आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा मनोदय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. शिवाजीमहाराज आणि राजर्षी शाहू यांचे नाव दिल्लीत गाजवायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रांतील नामवंतांना श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या व मेळघाटमधील आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉ. स्मिता व रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते रविवारी गौरविण्यात आले. त्या वेळी महाराज बोलत होते. संयोजक राजेंद्र धोर्डे पाटील, विलासराव धोर्डे पाटील व्यासपीठावर होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शाहूमहाराजांनी सामाजिक चळवळीत काम केले. सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यामुळे दिल्लीत वसतिगृह उभारावयाचे आहे. त्यासाठी सरकारकडून किंवा विकत जागा उपलब्ध करावयाची आहे. या कामासाठी पैसा नको तर केवळ साथ द्या.
पुरस्कारार्थींपैकी सीताबाई गायकवाड यांनी सत्काराला उत्तर दिले. हणमंतराव गायकवाड यांनी आईच्या चांगल्या संस्कारांमुळे यशाची वाट सुकर झाल्याचे नमूद केले. केवळ ८ जणांना घेऊन सुरू केलेले काम आता राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले असून ६५ हजार सहकारी कंपनीत काम करतात. यापुढच्या काळात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादनवाढ करण्याचा प्रयोग राबविणार आहे.
हर्षद निंबाळकर, आबासाहेब शिंदे, भरत शेट्टी, अंजली सिंगडे-राव यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र धोर्डे पाटील यांनी प्रास्तविकात पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. रूपाली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
>हे आहेत मानकरी
हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत हाऊसकीपिंग क्षेत्रात नाव कमाविलेले बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव व दत्तात्रय गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड आणि ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाहू बँकेचे संस्थापक आबासाहेब शिंदे, मधुमेहाच्या विकाराच्या उपचाराबाबत वेगळे संशोधन केलेले डॉ. प्रमोद त्रिपाठी, उद्योजक भरत शेट्टी व कलाक्षेत्रातील अंजली सिंगडे राव यांना विशेष कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
>दरमहा चारशे रुपयांत कुटुंब चालविण्याचे अवघड आव्हान स्वीकारून मेळघाटाचा रस्ता निवडला. त्या वेळी डॉक्टर म्हणून माझा स्वीकारही तेथील लोकांनी केला नाही. परंतु वाघाशी दोन हात केल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या हरिरामवर चारशे टाके घालून उपचार केले, तो आज जिवंत आहे. त्यानंतरच तेथील लोकांनी माझा डॉक्टर म्हणून स्वीकार केला.
- डॉ. कोल्हे

Web Title: Shivrajaya's name is in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.