शिवस्मारकाला हिरवा कंदील?

By admin | Published: August 9, 2014 02:18 AM2014-08-09T02:18:49+5:302014-08-09T02:18:49+5:30

येत्या आठवडय़ाभरात महाराष्ट्राला आनंद देणारे मोठे निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रलय जाहीर करण्याचे संकेत आज मिळाले.

Shivsamala green lantern? | शिवस्मारकाला हिरवा कंदील?

शिवस्मारकाला हिरवा कंदील?

Next
>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
येत्या आठवडय़ाभरात महाराष्ट्राला आनंद देणारे मोठे निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रलय जाहीर करण्याचे संकेत आज मिळाले. 
महाराष्ट्रातील एकूण 12 महत्त्वाच्या प्रकल्पांचे निर्णय प्रकाश जावडेकर यांनी घेतल्याचे सूत्रंनी सांगितले. मुंबई, पुणो, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथील रखडलेल्या अनेक प्रकल्पांना मान्यता मिळाल्याचे सांगून, अरबी समुद्रातील शिवस्मारक व नरिमन पॉइंट ते कांदिवलीर्पयतच्या कोस्टल रोडचाही समावेश असल्याचे सूत्रंनी सांगितले.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळाली असून, त्यातूनच महाराष्ट्रासाठी आठवडाभरात आनंदाचे निर्णय जाहीर  होण्याचे बोलले जाते.
मागील महिन्यात मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर जावडेकर यांनी बैठक घेतली होती. या बैठकीस पर्यावरण व वने मंत्रलयातील 1क्क् अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी जवळपास 35 प्रकल्प केंद्रीय मान्यतेसाठी अडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यातील अनेक प्रकल्प कागदपत्रंची पूर्तता झाल्यावरही रखडल्याचे सांगितले गेले. पाच वर्षापासून या प्रकल्पामध्ये सनदी अधिकारी चुकाच शोधत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर जावडेकर यांनी पर्यावरण व वने विभागातील अधिका:यांची बैठक घेऊन त्यांना महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प विनाविलंब मार्गी लावा, असे बजावल्याने आता अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहेत. 
यामध्ये प्रामुख्याने समुद्रातील शिवस्मारक, मुंबईतील 34.6 किलोमीटरचा कोस्टल रोड, गारगाई ते पिंजर या नद्यांमधून मुंबईकरांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वन विभागाची मान्यता, मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग होण्यासाठी कर्नाळा अभयारण्यातून परवानगी तसेच कोयना खो:यातील रखडलेले पुनर्वसन या विषयांवर निर्णय झाल्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र, जावडेकर यांनी योग्य वेळेची वाट पाहा, असे सांगितले. देशभरातून पर्यावरण मंत्रलयाकडे येणा:या फायलींची संख्या 5क्टक्के कमी केली आहे. राज्यांनाच काही निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Shivsamala green lantern?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.