आयएनएस विक्रांतवर शिवस्मारक करा

By admin | Published: May 9, 2014 12:17 PM2014-05-09T12:17:13+5:302014-05-09T12:20:11+5:30

नौदलातून निवृत्त झालेल्या व भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरच शिवस्मारक करावे असे मत पुण्यातील वास्तू रचनाकार प्रभाकर कोल्हटकर यांनी व्यक्त केले आहे.

Shivsankar on INS Vikrant | आयएनएस विक्रांतवर शिवस्मारक करा

आयएनएस विक्रांतवर शिवस्मारक करा

Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - नौदलातून निवृत्त झालेल्या व भंगारात काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या युध्दनौकेवरच शिवस्मारक करावे असे मत पुण्यातील वास्तू रचनाकार प्रभाकर कोल्हटकर  यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या युध्दनौकेचे जतनही होईल व शिवाजी महाराजांचे स्मारकही उभारता येईल असे त्यांनी म्हटले आहे. 
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहे. तर दुसरीकडे नौदलाने आयएनएस विक्रांत ही युध्दनौका भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे नौदलाला ६८ कोटी रुपये मिळणार आहेत. याविषयी प्रभाकर कोल्हटकर यांनी एक तोडगा सुचवला आहे.  एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीमध्ये त्यांनी हा तोडगा सुचवला आहे. 'शिवाजी महाराजांचे स्मारक आयएनएस विक्रांतवर उभारल्यास राज्य सरकारसाठी उपयुक्त ठरेल. यातून दोन्ही उद्दीष्ट साध्य करता येतील' असेही त्यांनी सांगितले. 
कोल्हटकर यांच्याच संकल्पनेतून गुजरातमधील बडोदे येथील सरदार सरोवर परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरु आहे. शहरी नियोजन विभागाचा दांडगा अनूभव असलेल्या कोल्हटकरांच्या या सूचनेचा राज्य सरकार सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करेल अशी आशा वर्तवली जात आहे. 

Web Title: Shivsankar on INS Vikrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.