श्रीहरी अणेंविरोधात शिवसेना आक्रमक, हक्कभंग आणणार

By admin | Published: December 11, 2015 11:36 AM2015-12-11T11:36:02+5:302015-12-11T11:58:06+5:30

स्वतंत्र विदर्भाबद्दल वक्तव्य करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेना हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.

Shivsena aggressive against the Shree Ahuja, will get rid of the aggressor | श्रीहरी अणेंविरोधात शिवसेना आक्रमक, हक्कभंग आणणार

श्रीहरी अणेंविरोधात शिवसेना आक्रमक, हक्कभंग आणणार

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेना हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.  
श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी असून आज सकाळी सेना आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणा-या शिवसेना नेत्यांनी आज अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहीजे असे सेना आमदारांचे म्हणणे आहे. 
विदर्भातलं जनमत घेतलं तर ८० टक्के लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असतील, असे वक्तव्य अणे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं

Web Title: Shivsena aggressive against the Shree Ahuja, will get rid of the aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.