शिवसेनेने पाठिंब्यासाठी विचारले होते - संजय निरुपम
By admin | Published: February 25, 2017 05:22 PM2017-02-25T17:22:57+5:302017-02-25T17:27:23+5:30
शिवसेनेने पाठिंब्यासाठी प्रस्ताव दिल्याचे समजले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास आमचा नकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. मनपा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनासाठी दोन्ही पक्षांकडून सत्तेची समिकरणं जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेसला सोबत घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
यावर शिवसेनेने पाठिंब्यासाठी प्रस्ताव दिल्याचे समजले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास आमचा नकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले. तसेच छोटे पक्ष मिळून महापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितले. संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, शिवसेनेकडून याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे, 'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.