शिवसेना बॅकफूटवर

By admin | Published: August 12, 2014 03:07 AM2014-08-12T03:07:20+5:302014-08-12T03:07:20+5:30

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर असलेले मतभेद संपवत, भाजपा-शिवसेनेने दिलजमाईचे संकेत दिले आहेत

Shivsena backfoot | शिवसेना बॅकफूटवर

शिवसेना बॅकफूटवर

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर असलेले मतभेद संपवत, भाजपा-शिवसेनेने दिलजमाईचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने बॅकफूटवर जात, या पदासाठी जाहीरपणे हक्क न सांगता मौन पाळले आहे.
विधानसभेच्या २८८ पैकी जास्तीतजास्त जागांवर दावा सांगण्यावरून अलीकडेच या दोन पक्षांतील मतभेद ताणले गेले होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुका होत असलेल्या चार राज्यांमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री असेल असे शनिवारी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केल्यानंतर, शिवसेनेने गेल्या दोन दिवसांपासून या मुद्यावर मौन पाळत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.
१४४ पेक्षा एकही जागा कमी नाही आणि मुख्यमंत्रिपदही देणार नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेने घेतली होती. उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू संजय राऊत यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी नुकतीच मोदींची दोनदा भेट घेतली. या भेटीत नेमके काय शिजले ते कळू शकले नाही. मात्र भविष्यात दोन्ही पक्षांनी वादग्रस्त विधाने करू नये, यावर सहमती झाल्याचे कळते. नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याऐवजी राज्याच्या राजकारणात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. पंकजा यांनी विधानसभा निवडणूक लढविली तर भाजपाला मुंडे यांचा बदली उमेदवार देणे अवघड काम ठरणार आहे. शहांनी चार राज्यांमधील निवडणूक प्रचाराची आखणी चालविली आहे.

Web Title: Shivsena backfoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.