ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:20 PM2024-03-28T19:20:38+5:302024-03-28T19:21:08+5:30
Loksabha Election 2024: पहिल्या यादीत कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी? पाहा...
Shivsena Shinde Group Candidate List: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsenapic.twitter.com/PGgRhVMrhK
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) March 28, 2024
शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, या यादीत रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
"१४ वर्षाचा वनवास संपला, जिथं रामराज्य..."; गोविंदानं हाती घेतलं 'धनुष्यबाण'
या पाच जागांबाबत सस्पेन्स कायम