शिवसेनेचं ठरलं...ठाकरेच केंद्रस्थानी
By admin | Published: January 24, 2017 01:55 PM2017-01-24T13:55:33+5:302017-01-24T19:28:19+5:30
आज शिवसेनेंचे नेते आणि आणि विभागप्रमुखांची मातोश्री वर तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी 227 उमेदवारांची यादी तयार आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राज्यातील महापालिका निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे चित्र दिसतं आहे. काल शिवसेनेने मुंबईसाठी वचननामा जाहीर करत आश्वासनांचा पाऊस पाडला. आज शिवसेनेचे नेते आणि आणि विभागप्रमुखांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी 227 उमेदवारांची यादी तयार आहे. या यादीतील उमेदवार निश्चित करणे आणि महाराष्ट्रभरात नेत्यांचे प्रचार दौरे आखण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेकडून स्टार प्रचाराकांच्या सभा, रोड शोच्या आयोजनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जास्त करुन प्रचार सभांना हजेरी लावणार आहेत. एबीपीच्या वत्तानुसार राज्याचे पर्यायवरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अमोल कोल्हे आणि शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे चार जण राज्यभर शिवसेनेच्या सभा घेणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एका दिवसाला दोन सभा घेणार आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक पुणे येथे उद्धव यांची जाहीर सभा तर आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. नागपूरमध्येही उद्धव ठाकरे सभा घेणार असून त्यांची शेवटची सभा ठाण्यात होणार आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे प्रचारासाठी गोव्यात जाणार आहेत.