Deepali Sayed : "...तर विजय शिवसेनेचाच होईल; आमदारांना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:16 AM2022-07-21T11:16:48+5:302022-07-21T11:27:52+5:30

Shivsena Deepali Sayed : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

Shivsena Deepali Sayed New Tweet Over CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | Deepali Sayed : "...तर विजय शिवसेनेचाच होईल; आमदारांना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही"

Deepali Sayed : "...तर विजय शिवसेनेचाच होईल; आमदारांना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही"

googlenewsNext

मुंबई - भाजपाचे १०६ आमदार, शिंदे गटातील ५० आणि इतर अपक्षांच्या मदतीने १६४ सदस्यांच्या पाठिंब्यावर नवं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे सगळ्यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांची निवड झाली. देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या २० दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं राज्याचा कारभार पाहत होते. मात्र रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी सातत्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. यात ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्याआधीच शिंदे गटाने नोटिशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ११ जुलैला ठेवण्यात आली. याच दरम्यान आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी नवं ट्विट केलं आहे. 

"आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) चर्चा केली तर मार्ग निघेल" असं दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र" असं दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
                

काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी मोठं विधान केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं होतं. तसेच भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद असं म्हणत भाजपाचे देखील आभार मानले होते. 

"येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं. 

"मला एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील. तर त्यांना एवढंच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे" असं देखील दीपाली यांनी याआधी म्हटलं आहे. 
 

Web Title: Shivsena Deepali Sayed New Tweet Over CM Eknath Shinde And Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.