Deepali Sayed : "काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:28 PM2022-07-04T12:28:12+5:302022-07-04T12:38:39+5:30

Shivsena Deepali Sayed Tweet : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.

Shivsena Deepali Sayed Tweet Over Uddhav Thackeray And Eknath Shinde | Deepali Sayed : "काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला"

Deepali Sayed : "काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला"

googlenewsNext

मुंबई - विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे. दरम्यान, विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. 

बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. याच दरम्यान शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी एक ट्विट केलं आहे. "काहीजण उद्धवसाहेब जिंकले म्हणतात तर काहीजण शिंदेसाहेब जिंकले बोलतात पण यासर्व घटनेत शिवसैनिक हरला" असं सय्यद यांनी म्हटलं आहे. 

दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काहीजण म्हणतात आदरणीय उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. यासर्व घटनेत शिवसैनिक हरला, त्याला कळत नाही की ही भूमिका शिवसेनेची किती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र" असं दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सय्यद यांनी याआधी देखील ट्विट केलं होतं. "माननीय शिवसेना आमदार महोदय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून युती झाली तर पुढची साडेसात वर्ष सत्तेची मग शिवसेनेला मुख्यमंत्री पद त्यात असणार का? बहुमतचाचणी करण्याआगोदर पक्षप्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये" असं म्हटलं होतं. 
 

Web Title: Shivsena Deepali Sayed Tweet Over Uddhav Thackeray And Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.