शिंदेवाडी सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व
By admin | Published: July 22, 2016 01:19 AM2016-07-22T01:19:25+5:302016-07-22T01:19:25+5:30
ससेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १० पैकी २ जागा बिनविरोध झाल्या
भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी, ससेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १० पैकी २ जागा बिनविरोध झाल्या, तर निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व ८ जागा शिवसेनेने जिंकून सोसायटीवर वर्चस्व मिळविले.
शिंदेवाडी सोसायटीच्या एकूण जागा १० असून, राखीव असलेल्या तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. संस्थेवर कॉँग्रेसचे वर्चस्व होते. महिलांसाठी राखीव असलेल्या २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या वेळी भोर तालुका शिवसेनाप्रमुख माऊली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झोराळीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलने निवडणूक लागलेल्या सर्व आठ जागांवर विजय मिळवून विविध कार्यकारी संस्था कॉँग्रेसकडून शिवसेनेने ताब्यात घेतली.
निवडणुकीत विजयी उमेदवार : दत्तात्रय गोगावले, रामभाऊ गोगावले, सतीश गोगावले, दत्तात्रय जाधव, ज्ञानोबा वाडकर, महादेव वाडकर, पमाजी वाडकर, शंकर वाडकर, रुक्मिणी वाडकर, बायडाबाई वाडकर.(वार्ताहर)