शिवसेनेला खेड, जुन्नर

By admin | Published: March 15, 2017 12:27 AM2017-03-15T00:27:03+5:302017-03-15T00:27:03+5:30

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतीपद पदरात पाडले आहे

Shivsena Khed, Junnar | शिवसेनेला खेड, जुन्नर

शिवसेनेला खेड, जुन्नर

Next

पुणे : पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जुन्नर व खेड तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने ‘हात’ दिला असून येथे उपसभापतीपद पदरात पाडले आहे. तर १३ पैैकी सात पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दोन्ही पदांवर वर्चस्व मिळवले आहे. दोन ठिकाणी काँग्रेसचे, तीन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी भाजपाचे सभापती झाले आहेत.
राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत बहुमत मिळवले. ७५ पैैकी ४४ जागा मिळवल्या, तर आंबेगाव, बारामती, भोर, दौैंड, शिरूर, मुळशी या पंचायत समित्यांत बहुमत मिळवले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पदे मिळवता आली आहेत. तसेच पूर्ण बहुमत न मिळालेल्या वेलीत सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचे झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या हवेली पंचायत समितीत २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर उर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत त्यांना जागा मिळवण्यात अपयश आले होते. मात्र पंचायत समितीवर त्यांचे वर्चस्व राखले होते. आज झालेल्या सभापती, उपसभापती निवडणुकीतही त्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. तसेच वेल्हा तालुक्यात काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे.

Web Title: Shivsena Khed, Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.