'कोणती शस्त्र कोणासाठी आणि कशासाठी काढली जातात हे कळेलच'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 12:47 PM2021-10-15T12:47:52+5:302021-10-15T12:48:49+5:30
ShivSena Dasara Melawa: शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात होत आहे.
मुंबई: आज सर्वत्र दसऱ्याचा जल्लोष आहे. सर्वजण दसरा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. दरम्यान, राज्यातील जनेतेचे आज होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर(Shivsena Dasara Melawa) लक्ष्य लागून आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार, है पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, आजच्या मेळाव्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मोठं भाष्य केलं आहे.
शिवसेना काय करणार हे समजेल
शिवसेनेचा दसरा मेळावा आज येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. बंदीस्त सभागृहातल्या कार्यक्रमावरील मर्यादा हटवल्यामुळे आता हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. दरम्यान, या मेळाव्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळाव्याला शमीच्या झाडावरील शस्त्र काढली जातात. हे शस्त्र कुणासाठी, कशासाठी काढली जातात हे कळेलच. दरवर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो, पण कोविडमुळे हा षण्मुखानंद सभागृहामध्ये सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. शिवसेना काय करणार, काय होणार हे, समजेल. संपूर्ण देशाला जाणून घ्यायचंय की शिवसेना पक्ष प्रमुख कोणती राजकीय दिशा घेऊन पुढे जातील, असे राऊत म्हणाले.
भविष्यात शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानी
राऊत पुढे म्हणाले की, आज विजयादशमी असल्यामुळे शुभ बोललं पाहीजे. शिवसेना 2024ला राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असेल, 2024ला सगळं काही स्पष्ट होईल. देशात शिवसेनेचे 22 खासदार येत्या काही दिवसात पाहायला मिळतील. दादरा नगर हवेलीचा खासदारही शिवसेनेचा असेल, असा दावा राऊत यांनी यावेळी केला. तसेच,
मोहन भागवत अगदी बरोबर बोलले
संजय राऊत यांनी यावेळी सरसंघचालक भागवत यांच्या आरएसएसच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरही भाष्य केलं. मोहन भागवत बरोबर आहेत. त्यांनी देशासमोर ठेवलेले मुद्दे अगदी योग्य आहेत. अंमली पदार्थांचा पैसा जर देशविघातक कारवायांसाठी वापरला जातोय तर केंद्र सरकार काय करत आहे? नोटबंदीनंतरही जर देशविघातक कारवाया बंद होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे. बनावट नोटा आणि ड्रग्जमुळे दशशतवाद्यांना पैसा मिळतो, असं राऊत म्हणाले.