मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 11:46 AM2017-10-22T11:46:52+5:302017-10-22T11:47:38+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले.

Shivsena MLA and minister Sanjay Rathod dropped from the Chief Minister's Yavatmal tour | मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

googlenewsNext

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. राठोड यांनी या प्रकाराबाबत ‘लोकमत’शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. 

राठोड म्हणाले, मी चार टर्म  आमदार आहे. सध्या मंत्री आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोनच मंत्री असताना शिवसेनेला या दौ-यापासून दूर ठेवण्यामागील भाजपाची भूमिका अनाकलनीय आहे. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार असताना मला मुख्यमंत्र्यांच्या दौ-याबाबत आवर्जून कळविले जात होते. मात्र, शिवसेना हा भाजपाचा सत्तेतील सहकारी पक्ष असतानाही आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दौ-यापासून दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य वाटते. 

भाजपाला आंदोलकांची एवढी भीती वाटण्याचे कारण काय, हेच समजत नाही. मुख्यमंत्र्यांची खासगी भेट असेल तर समजू शकतो. मात्र, या सार्वजनिक भेटीत आमदार, खासदार व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे, त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहे, हे समजून घेणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले. 

एकीकडे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर भोजनासाठी सहपरिवार आमंत्रित करतात आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौºयातून वगळतात, हे राजकीयदृष्ट्या योग्य नाही. मला मुख्यमंत्र्यांच्या दौºयापासून अनभिज्ञ ठेवण्यामागे नेमका राजकीय डाव आहे की प्रशासकीय, याचा शोध घेणे गरजेचे आहे. शिवसेनेला मिळणा-या या दुय्यम वागणुकीचा मुद्दा आपण वरपर्यंत लावून धरणार असल्याचे राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
मुख्यमंत्र्यांच्या दौ-याबाबत प्रशासन किंवा भाजपाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजल्याने आपण चौकशी केली असता, मुख्यमंत्री आज यवतमाळात असल्याचे समजले, असेही राठोड यांनी स्पष्ट केले. हा दौरा गोपनीय ठेवण्यामागे मुख्यमंत्र्यांना आणि विशेषत: भाजपाला शिवसैनिकांची भीती वाटत असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Shivsena MLA and minister Sanjay Rathod dropped from the Chief Minister's Yavatmal tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.