'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:42 AM2021-12-27T11:42:54+5:302021-12-27T11:43:16+5:30

'पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही, पण देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी देणगी मागणे योग्य नाही.'

Shivsena MP Sanjay Raut slams governor Bhagat Singh Koshyari over assembly speaker election | 'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

Next

मुंबई: शिवसनेचे खासदार संजय राऊत (Snjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना चिमटा काढला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो, असे आश्वासन भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले होते. याच आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, 'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. घटनेत स्पष्ट लिहिले आहे की, मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्हाला मान्य कराव्या लागतात. त्यामुळे आमच्या 12 आमदारांची नियुक्ती बंधनकारक आहे. त्यामुळे इतका अभ्यास बरा नाही,' असे म्हणत राऊतांनी कोश्यारींना चिमटा काढला.

शांतता अभ्यास सुरू आहे...
राऊत पुढे म्हणाले की, 12 आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असे नवीन नाट्य राजभवनात सध्या सुरू आहे. केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल, नाटक रंगू द्या. 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटके होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या निधीवर टीका
यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाजपसाठी निधी मागण्यावरही टीका केली. 'भारत शेतकऱ्यांमुळे, कष्टकऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे बलाढ्य झाला. मात्र आम्हाला आताच नव्याने समजले की, भाजपला देणग्या दिल्याने देश बलाढ्य होतो. देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका असा स्पष्ट संदेश आहे. देशातील लोकांकडून देणग्या घेणे हा बहाणा आहे. हा देशातील उद्योगपतींना स्पष्ट संदेश आहे की देणग्या आम्हालाच द्या. दुसऱ्याला दिल्या तर आमचे त्यावर लक्ष राहील. पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी निधी मागणे योग्य नाही, हे पंतप्रधानांचे काम नाही,' असेही राऊत म्हणाले.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut slams governor Bhagat Singh Koshyari over assembly speaker election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.