युती तोडण्याचा शिवसेनेचा पूर्वनियोजित डाव होता : प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 05:17 PM2020-01-15T17:17:29+5:302020-01-15T17:20:17+5:30
राऊत यांनी आज केलेल्या या विधानावरून युती तोडण्याचा आधीपासूनच ठरले होत हे स्पष्ट झाले असल्याचे दरेकर म्हणाले.
मुंबई : भाजप शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. म्हणून महाविकास आघाडीबाबत आमचा निर्णय निवडणुकीआधीच झाला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी लोकमत पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलताना केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.
राऊत यांनी केलेल्या या गौप्यस्फोटाला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांना भविष्यात काय होणार हे चांगलेच कळत असून त्यांचे भाकीत तंतोतंत खर होत असल्याचा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शिवसेनेचा पूर्वनियोजित डाव होता, अशी आतापर्यंत शंका होती. मात्र राऊत यांनी आज केलेल्या या विधानावरून युती तोडण्याचा आधीपासूनच ठरले होत हे स्पष्ट झाले असल्याचे दरेकर म्हणाले.
तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व काँग्रेससोबत जाण्याचे आधीपासूनच शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात होते. त्याचं तसं ठरले होते हे आता सिद्ध झाले असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.