शिवसेना प्रादेशिक पक्षांचा बाप, मोदींना विजयसभेचे निमंत्रण - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 12, 2017 07:26 AM2017-02-12T07:26:05+5:302017-02-12T08:26:23+5:30
शिवसेना हा देशातील सर्व प्रादेशिक पक्षांची बाप आहे. मोदीना मी अत्यंत्य विनम्रपणे निमंत्रण देतोय. 23 फेब्रुवारीला होणाऱ्या सेनेच्या विजयी
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - शिवसेना ही देशातील सर्व प्रादेशिक पक्षांची बाप आहे. देशातील इतर प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना पर्याय ठरू शकतात तर शिवसेनाही महाराष्ट्रात ते करू शकते. भाजपाने कितीही जोर लावला. मोदींची सभा घेतली ती मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच विजय होणार आहे. त्यामुळे 23 फेब्रुवारीला होणाऱ्या विजयी जल्लोशात सहभागी होण्याचे आमंत्रण मी मोदींनी देतोय, अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीमधील शेवटच्या भागात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा घणाघात केला. यावेळी नोटाबंदी, दहशतवाद, शिवस्मारक, डॉ. आंबेडकरांचे स्मारक अशा विविध मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. यावेळी राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्ष पर्याय ठरतात असे सांगत महाराष्ट्रात ते काम शिवसेना करेल अशा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले. "देशात ज्या ज्या राज्यात समर्थ पर्याय उभा राहिलाय. तिथे जनतेने राष्ट्रीय पक्षांना नाकारून प्रादेशिक पक्षांना साथ दिली आहे. मग असे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, अशा प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना ही सर्वात जुनी आहे. त्यादृष्टीने शिवसेना प्रादेशिक पक्षांची बाप आहे. युतीमध्ये आमची 25 वर्षे सडली या मतावर मी अद्याप ठाम आहे. युतीमुळे फसगत झाल्याची भावना आहे. भाजपाबरोबरची युती तो़डणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा फायदा झालाय. प्रादेशिक अस्मिता आणि स्वत:ला न्याय देणारा पक्ष आवडतो."
या मुलाखतीती उद्धव यांनी भाजपा आणि मोदींनाही पुन्हा लक्ष्य केले. ते म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या तरी मुंबईत शिवसेनेचाच विजय होणार आहे. त्यामुळे मोदींनी मुंबईत प्रचारसभा घेतलीच तर शिवसैनिक मोदींना भेटून त्यांना 23 तारखेच्या विजयसभेचे निमंत्रण देतील."