"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 01:43 PM2022-06-19T13:43:30+5:302022-06-19T14:25:01+5:30

"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल."

Shivsena; Sanjay Raut; "Mr Fadnavis cannot run the state by mere conspiracies" - Sanjay Raut | "मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

googlenewsNext

मुंबई: आज शिवसेनेचा 56वा वर्धापणदिन आहे. यानिमित्त मुंबईत मोठा कार्यक्रम होत आहे. यावेळी शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ''मी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते, त्यावर भाजपने टीका केली होती. श्रीलंकेत जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा भारतातील परिस्थिती अशीच व्हायला वेळ लागणार नाही, असं मी म्हणालो होतो.'' 

'तरुणांसमोर सैन्याचा वापर'
"त्याच्या एका महिन्याच्या आत देशातील परिस्थिती तशीच झाली आहे. तरुणांना रोखण्यासाठी सैन्य मागवावे लागले. बिहारमध्ये सैन्य आले, याला राज्य चालणे म्हणत नाहीत. राज्य चालवणे पाहायचे असेल, तर मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही. राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावे लागेल. ती क्षमता शिवसेनेकडे आहे.'

संबंधित बातमी- 'तेरा घमंड चार दिन का है पगले...', संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

'शिवेसनेच्या अंगावर किरोकोळ लोक सोडले'
'शिवसेनेचा 56 वर्षांचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता इतिहास आहे. अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचे काम 56 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी केले, आजही न्यायाच्या लढाईत सर्वात पुढे शिवसेनाच आहे. शिवेसनेच्या अंगावर किरोकोळ लोक खूप सोडले, राणा-बाणा-काणा. पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरोधात लढण्याचा बाणा, हा सगळ्यांच्या छाताडावर पाय ठेवून उभा आहे."

'अंगावर आलात तर...'
"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. केंद्रीय यंत्रणेची मस्ती आम्हाला दाखवली. सीबीआय, इडी, इनकम टॅक्स मागे लावले. पण, आम्ही कोणाला भीत नाही. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल, असा इशाराही राऊतांनी दिला.

Web Title: Shivsena; Sanjay Raut; "Mr Fadnavis cannot run the state by mere conspiracies" - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.