Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 09:30 PM2022-12-03T21:30:44+5:302022-12-03T21:33:11+5:30

भाजपावर टीका करणाऱ्या राऊतांवर आज शेलारांनी पलटवार केला

Shivsena Sanjay Raut sarcastically trolled by BJP Ashish Shelar over talkative approach | Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

Next

Sanjay Raut vs BJP: महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका करत होते. त्यानंतर पत्राचाळ प्रकरणी त्यांना काही काळ तुरूंगवास भोगावा लागला. पण जामीनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा ते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. नित्यनेमाने ते सकाळी एखाद्या विषयावर आपले रोखठोक मत पत्रकारांशी संवाद साधताना मांडताना दिसतात. याच मुद्द्यावरून भाजपाचे आशिष शेलार यांनी त्यांना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत, असे शेलार म्हणाले.

"संजय राऊत यांना करायचे काहीच नाही. रोज तोंडातून गरम हवा सोडायची हेच त्यांचे काम आहे. त्यापेक्षा त्यांनी बॉयलर उघडावा आणि कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत. सत्तेत असताना संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न का सोडवला नाही. सत्तेत असताना भवन का नाही बांधले? त्यामुळे केवळ तोंडाची गरम वाफ बाहेर काढून यातून राज्याचे भले होईल हा त्यांचा गैरसमज आहे," असे शेलारांनी सुनावलं.

ठाकरेंच्या घोषणेतून समजायचं ते समजा!

या वेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री संबंधित या प्रश्नावर उत्तर दिले. "उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी मी एवढा मनकवडा नाही. पण मला उद्धव ठाकरे यांची घोषणा चांगलीच माहिती आहे. त्यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यावरुन तुम्ही काय समजायचे ते समजा," असे ते म्हणाले.

कर्नाटकने 'आरे' केले तर आम्हीही 'कारे' ने उत्तर देऊ!

"महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने तणावाचे होऊ नये अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पहिला अधिकार त्या गावांवर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यावर भूमिका स्पष्ट आहे. शिंदे सरकार त्या भागामध्ये अनेक योजना पोहोचवणार आहे. जत भागात पाण्याच्या संदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. कुणी अरे केले तर आम्ही कारे करू. आमचा प्रयत्न कोर्टात भूमिका मांडतो आहे. कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून त्याला उत्तर देऊ..कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रातील मंत्री तिथे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shivsena Sanjay Raut sarcastically trolled by BJP Ashish Shelar over talkative approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.