शिवसेनेने आपली जबाबदारी ओळखावी!
By Admin | Published: November 29, 2015 03:21 AM2015-11-29T03:21:15+5:302015-11-29T03:21:15+5:30
सत्ताधारी असूनही सातत्याने टीका करण्यापेक्षा शिवसेनेने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. आता विदर्भातील दुष्काळी तालुक्यांचे दौरे करण्यास सेनेच्या आमदारांनी सुरुवात केली आहे.
नाशिक : सत्ताधारी असूनही सातत्याने टीका करण्यापेक्षा शिवसेनेने जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. आता विदर्भातील दुष्काळी तालुक्यांचे दौरे करण्यास सेनेच्या आमदारांनी सुरुवात केली आहे. त्यांनी जबाबदारी ओळखून काम सुरू केल्याचे समाधान वाटते, असा चिमटा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे काढला. (प्रतिनिधी)
सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेत
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यावर आपण काहीही बोलू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्याच शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, असे काही नाही. उलट गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे. आधी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण १२ ते १४ टक्के होते. नवीन सरकारच्या काळात ते ४१ टक्के इतके झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे सक्षमपणे काम करीत असून, अन्य जबाबदारी सोपविण्याचेही अधिकार त्यांनाच आहेत, असेही खडसे म्हणाले.
राज्यामध्ये शिवसेनेला जनतेनेच दुय्यम स्थान दिले आहे. त्यांच्यावर आम्ही कोणताही अन्याय केलेला नाही. अन्यायाबाबत भाजपाबाबत होणारी टीका ही अनाठायी आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी कोल्हापुरात एका कार्यक्रमात केली.