"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:11 AM2022-11-30T09:11:36+5:302022-11-30T09:15:59+5:30

"शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत."

Shivsena Slams shinde Fadnavis government over farmers and mahavitaran in saamana editorial | "...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?"

"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?"

Next

राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही 'सकारात्मक' वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग-व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही. शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 

"खरीपाचे पीक महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठय़ा उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची 'टोळधाड' रब्बीचे पीकही उद्ध्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, 'फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.' महावितरण म्हणते, 'वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.' मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. या कारभाराच्या कचाटय़ात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हय़ातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या 'पठाणी टोळी'ने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे" असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख

- राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही 'सकारात्मक' वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग-व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही. शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे. या सरकारच्या कारभाराने राज्यातील आणखी एका थकबाकीपीडित शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. 

- नगर जिल्हय़ातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. 

- शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत. वीज बिलाची थकबाकी हा सरकारसाठी प्रश्न असला तरी त्याचे उत्तर तुम्ही बळीराजाच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवून मिळविणार आहात का? थकबाकीसाठी कुठल्याही शेतकऱयाची वीज कापली जाणार नाही, असे पत्रक काढल्याच्या गमजा हे सरकार मारते आणि दुसरीकडे नगर जिल्हय़ात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱयावर स्वतःचे जीवन संपवून घेण्याची वेळ येते. 

- पोपट जाधव यांच्या शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, पण त्यामुळे त्यांचा जीव परत येणार आहे का? त्यांच्या उघडय़ावर पडलेल्या कुटुंबाचे काय? राज्य सरकारकडे या प्रश्नांचे काय उत्तर आहे? मुळात हे सरकार स्वतःच मिंधे आहे. त्याला फक्त खोक्यांचीच भाषा कळते. त्यांना त्यांच्याच कारभारामुळे शेतकऱयांच्या डोळय़ांत आलेल्या अश्रूंची भाषा काय कळणार? तीन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्यात आम्ही याच प्रश्नावरून राज्य सरकारच्या पाठीत आसुड ओढला होता. 

- जर वीज कनेक्शन तोडायचे नाही, असे सरकारचे आदेश आहेत तर मग जाधव यांची वीज कशी तोडली गेली? फुकाच्या वगैरे गप्पा आपण मारीत नाहीत, असे म्हणणाऱयांचे शब्द आता कुठल्या हवेत विरले? शासनाचे पत्रक महावितरण जुमानत नाही, असाच या घटनेचा अर्थ आहे. खरीपाचे पीक अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. त्याच्या नुकसानभरपाईच्या मोठमोठय़ा गप्पा मिंधे सरकारने मारल्या. नुकसानभरपाईचे आकडेही फुगवून सांगितले. प्रत्यक्षात किती शेतकऱयांच्या खात्यात त्यातील किती रक्कम जमा झाली, हा प्रश्नच आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Read in English

Web Title: Shivsena Slams shinde Fadnavis government over farmers and mahavitaran in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.