Uddhav Thackeray : माशाचे अश्रू दिसत नाहीत; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मनातलं दुःख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:21 PM2022-07-08T14:21:07+5:302022-07-08T14:50:57+5:30
Shivsena Uddhav Thackeray : मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असं बोलणार नाही.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. याच दरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. "आषाढी एकादशी जवळ आली आहे. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरल जाईन, दर्शन घेईन. मातोश्रीवर जनतेचे लोढेंच्या लोंढे येत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मी बोलणार आहे, बोलत राहीन, पण सैनिकांच्या मनावर दडपण वाढेल असं बोलणार नाही. हजारो जण पंढरपूरला पोहचत आहेत. मलाही निमंत्रण आलं आहे. नंतर मी पंढरपूरला जाईन, नंतर दर्शन घेईन" असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी माशाचे अश्रू दिसत नाहीत असं म्हणत आपल्या मनातलं दुःख व्यक्त केलं आहे. "शिवसेना प्रमुखांना मागे एकदा विचारलं होतं की तुम्हाला वाईट वाटतं की नाही? त्यावेळी ते म्हणाले होते की माशाचे अश्रू दिसत नाहीत... भावना मलाही आहेत, वाईट मला ही वाटलं. मी आजही बोलेन, उद्याही बोलेने... माझ्या सैनिकांवरचं दडपण कमी करणं हे काम आहे. मला जो त्रास झाला तो कोणाला झाला नसेल" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
एका गोष्टीचा नक्की अभिमान होता आणि आहे, शिवसेनेने आज पर्यंत राजकीय पार्श्वभूमी आहे की नाही याचा विचार न करता.. साध्या साध्या माणसांना मोठं केलं..
— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 8, 2022
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
"शिवसेनेच्या चिन्हाबद्द्ल सध्या चर्चा सुरू आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघून मतदान करतात. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली... ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत.." असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'तुमचं माझ्यावर अजूनही प्रेम...', उद्धव ठाकरेंनी चक्क बंडखोरांचेच मानले आभार; नेमकं काय म्हणाले?
"आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही.. अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे, जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे मी जाहीर कौतुक करतो.. काही वाट्टेल ते होवो आम्ही नाही हटणार, या जिगरीची माणसं जिथे असतात तिथेच विजय असतो. शिवसेनेचे काही वाकडं होऊ न देण्याची ताकद आजही शिवसैनिकांच्या मनगटात आहे" असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.