Uddhav Thackeray : "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा"; उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:53 PM2022-09-21T20:53:04+5:302022-09-21T21:07:07+5:30

Shivsena Uddhav Thackeray : "शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे."

Shivsena Uddhav Thackeray telling the councilors if you want to go, go now | Uddhav Thackeray : "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा"; उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray : "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा"; उद्धव ठाकरेंनी भर सभेत स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? नवीन नाही. शिवाजी महाराजांपासूनच्या काळापासून सुरू आहे. आम्हाला जमीन दाखवणार आहेत, ही गवताची पाती नाहीत, तलवारीची आहेत" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच "नगरसेवकांना सांगतोय जायचं असेल तर आताच जा" असंही भर सभेत स्पष्टच सांगितलं आहे. 

"शिंदे जेव्हा सुरतेला पोहोचले होते, तेव्हा माझ्यासोबत ३०-४० आमदार बसलेले होते. त्यांना कोंडून ठेवू शकलो असतो. मी म्हणालो ज्यांना जायचेय त्यांनी जावे. नगरसेवकांनाही सांगतोय तुम्हाला जर जायचं असेल तर आताच जा" असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आयुष्यातील ही पहिलीच निवडणूक आहे असे समजून कामाला लागा. प्रत्येक शाखा उघडी असायला हवी. त्या शाखेत गटप्रमुखही असायला हवेत असंही म्हटलं आहे. 

"हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा"

"पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. अमित शाह यांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा" असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे. तसेच "शिंदेंच्या सरकारला फिरण्याची सवयच झालीय. सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली... रक्तपात झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील. ते होऊ द्यायचे नाहीय म्हणून मी शांत राहण्यास सांगितले" असंही म्हटलं आहे. 

"मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय?"

'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह येऊन गेले. निवडणुक आल्यावरच तुम्ही येता, तुमच्यासाठी मुंबई फक्त जमिनीचा तुकडा असेल. पण, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे. मुंबादेवी म्हणजेच मुंबई आमची आई आहे. आजकाल आईला गिळणारी लोकही येत आहे. मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय? मी पहिल्यांदा कमळाबाईवर बोलतोय. हा शब्द माझा नाही, बाळासाहेबांनी दिलाय. मुंबईवर चालून येण्याचे धाडस करू नका. दसऱ्याला यांची लख्तरे काढणारच आहे,' असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. 

 

Web Title: Shivsena Uddhav Thackeray telling the councilors if you want to go, go now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.