शिवसेना आमदार भास्कर जाधव प्रतिक्रिया देत होते, तितक्यात नारायण राणेंची गाडी आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:56 PM2021-08-24T19:56:03+5:302021-08-24T20:03:10+5:30
नारायण राणेंची मानसिक स्थिती ठीक नाही. सकाळी राणेंनी वक्तव्य केले होते. मी Normal माणूस नाही. माझा देखील हा दावा आहे
चिपळूण – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राणेंच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत होते. राज्यभरात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी राणेंविरोधात संताप व्यक्त करत आंदोलन केले. शिवसेनेच्या विविध नेत्यांनी नारायण राणेंविरोधात भाष्य केले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही राणेंवर जोरदार प्रहार केला.
भास्कर जाधव म्हणाले की, नारायण राणेंची मानसिक स्थिती ठीक नाही. सकाळी राणेंनी वक्तव्य केले होते. मी Normal माणूस नाही. माझा देखील हा दावा आहे की नारायण राणे Normal नव्हे तर Abnormal आहेत. त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने चुकीचं विधानं करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. जर उपचार झाले नाहीत तर काहीतरी गुन्हे करतील म्हणून त्यांना अटक करायला हवी असं त्यांनी सांगितले. परंतु राणेंच्या अटकेवर ही प्रतिक्रिया देताना योगायोगानं नारायण राणेंची गाडी त्याच्या बाजूनेच पुढे गेली.
नारायण राणे यांची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यांच्यावर उपचाराची गरज, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची टीका #NarayanRaneArrest#BhaskarJadhavpic.twitter.com/Y671d91UgN
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021
नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव?
"राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना शाप दिला होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे", असं भास्कर जाधव म्हणाले होते.
राणे कोकणाला लागलेला महाकलंक
"राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणायचं ते तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहेत. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्य चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून राणेंनी असं विधान करणं शोभतं का? राणेंचं शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही", असं इशारा भास्कर जाधव यांनी दिला होता.
पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?
सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. यात अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसतात. त्यात कसलं अटक वॉरंट मागतायेत? पोलीस बळाचा वापर करून अटक करा असं ते सांगत असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. तर रत्नागिरी एसपी नारायण राणेंकडे गेले असता त्यांच्याकडे अटक वॉरंटची मागणी होत आहे. जोपर्यंत अटक वॉरंट दाखवत नाहीत तोवर अटकेला विरोध करू असा पवित्रा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतला आहे.