शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

By admin | Published: July 11, 2017 03:40 AM2017-07-11T03:40:58+5:302017-07-11T03:40:58+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला

Shivsena's Dhol Bajao movement | शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला याची माहिती मिळावी, या मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके(आरडीसीसी) समोर सोमवारी ढोल बजाओ आंदोलन केले.
शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख रवी मुंडे, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, बबन पाटील, अलिबाग शिवसेना प्रमुख दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांची या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्यांनी शिष्टमंडळास दिली. राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीकरिता आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना नाईक म्हणाले, २०१५-१६ मधील खरीप हंगामात १९ हजार ३५० सभासदांना रक्कम ६७३३.७० लाख रुपये, रब्बी हंगामात ३ हजार ४२० सभासदांना १२३४.३६ लाख कर्जवाटप झाले. त्यापैकी ३०जून २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामातील १७ हजार ९२१ सभासदांची ७३६९.५४० लाख रु. रक्कम वसूल झाली. याचाच अर्थ ३० जून २०१६ अखेर १ हजार ४२९ सभासदांकडून ५९८.५२ लाख इतकी रक्कम येणे बाकी होती. बँकेची ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून आजपर्यंत जाहीर केलेल्या योजनेच्या परिपत्रकानुसार आहे. सहकार खात्याकडून याचे लेखापरीक्षण झाले नसल्याने या माहितीमध्ये लेखापरीक्षणानंतर बदल होवू शकतो. तसेच शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष सरकारकडे या कर्जमाफीसंदर्भात अनेक नवीन मागण्या करत असल्याने तसेच सरकारतर्फे योजनेमध्ये सुध्दा बदल केला जात असल्याने या माहितीमध्ये बदल होवू शकतो, असे नाईक यांनी सांगितले.

Web Title: Shivsena's Dhol Bajao movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.