शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

By Admin | Published: September 14, 2016 04:20 AM2016-09-14T04:20:27+5:302016-09-14T04:20:27+5:30

येथील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी देवीच्या मंदिरात बकरी ईदच्या दिवशी प्रवेशाचा व पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी दरवर्षीप्रमाणे मंगळवारीही शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले

Shivsena's Ghantanad movement | शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

googlenewsNext

कल्याण : येथील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडी देवीच्या मंदिरात बकरी ईदच्या दिवशी प्रवेशाचा व पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी दरवर्षीप्रमाणे मंगळवारीही शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा आदेश मोडल्याप्रकरणी शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आणि नंतर त्यांची सुटका केली.
या किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम तेथे नमाज पठण करतात, तर हिंदू संघटना मंदिरात आरतीसाठी घंटानाद आंदोलन करतात. मात्र, यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस त्यांना किल्ल्यापर्यंत जाण्यास मज्जाव करतात. मंगळवारी सकाळीही शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन करून मंदिर प्रवेशाचा हक्क मागितला.
टिळक चौकात टिळकांच्या पुतळ््याला हार घालून आरती म्हणत शिवसैनिक आंदोलनासाठी दुर्गाडीच्या दिशेने निघाले. यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भिवंडीचे प्रकाश पाटील, रवींद्र कपोते, सचिन बासरे, विजया पोटे आदी सहभागी झाले होते. त्यांना लालचौकी येथे दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी आरती केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली.

चुकीचा संदेश जाऊ
नये, यासाठी खबरदारी
शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व पालकमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनास अनुपस्थित होते. मंत्री असल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. मात्र मानपाडा पोलीस ठाण्यात शिंदे उपस्थित होते. आंदोलन केल्यास पालकमंत्र्यांना अटक, असा संदेश जाऊ नये, यासाठीच पोलिसांच्या सांगण्यावरून शिंदे आंदोलनात सहभागी झाले नाहीत, असे सांगण्यात आले. शिंदे यांच्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही आंदोलनावेळी अनुपस्थित होते.

Web Title: Shivsena's Ghantanad movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.