शिवसेना सत्ताधारी की विरोधी?

By admin | Published: March 1, 2015 01:28 AM2015-03-01T01:28:53+5:302015-03-01T01:28:53+5:30

सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना सत्ताधारी आहे की विरोधी, असा सवाल करत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर टोलेबाजी केली.

Shivsena's opposition to the ruling? | शिवसेना सत्ताधारी की विरोधी?

शिवसेना सत्ताधारी की विरोधी?

Next

राहुरी (अहमदनगर) : सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना सत्ताधारी आहे की विरोधी, असा सवाल करत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर टोलेबाजी केली. जमिनींचे व्यवहार आॅनलाईन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमित्त पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला चांगलेच खडे बोल सुनावले. भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असतानाही शिवसेना दुहेरी भूमिका बजावत आहे़ भूसंपादनाची माहिती न घेता सेनेने घेतलेली भूमिका चुकीची असल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. तसेच काही त्रुटी सूचविल्यास सरकार त्या बदलण्यास तयार असल्याचे त्यांनी मान्य केले़ भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी महसूल विभागात पारदर्शकता आणण्यात येत असून जमिनींची आॅनलाईन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नजीकच्या काळात दुय्यम निबंधकाकडे जाण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
खडसे म्हणाले, सातबारा उताऱ्यासह अन्य रेकॉर्ड जीर्ण झाले आहेत.त्यादृष्टिकोनातून पावले उचलण्यात आली आहेत.जीर्ण झालेले रेकॉर्ड डीजिटल करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली़ इंग्रजांच्या काळात जमिनीची मोजणी १८८० मध्ये झाली होती़
आता ती आॅनलाईन करण्याचे नियोजन आहे. प्रतिज्ञापत्रासाठी यापुढे मुद्रांकाची गरज राहणार नाही. साध्या कागदावर स्वलिखित दस्तही त्यासाठी ग्राह्य धरला जाईल. शेतकऱ्यांना सात-बारा उतारा आॅनलाईन मिळवता येईल, त्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. (प्रतिनिधी)

च्सातबारा उताऱ्यासह अन्य रेकॉर्ड जीर्ण झाले आहेत.त्यादृष्टिकोनातून पावले उचलण्यात आली आहेत.
च्इंग्रजांच्या काळात जमिनीची मोजणी १८८० मध्ये झाली होती़ आता ती आॅनलाईन करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Shivsena's opposition to the ruling?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.