समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध
By admin | Published: June 26, 2017 02:24 AM2017-06-26T02:24:15+5:302017-06-26T02:24:15+5:30
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर ठाणेदाराने मारहाण केल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित ठाणेदाराविरुद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे (अमरावती) : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर ठाणेदाराने मारहाण केल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित ठाणेदाराविरुद्ध त्याच पोलीस ठाण्यात कलम ३०६ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी नोंदविण्यात आला.
विनोद लवणे (४०) असे मृताचे नाव असून गावातील एक व्यक्ती आपल्याला दररोज शिवीगाळ करीत असल्याची फिर्याद घेऊन तो शनिवारी मंगरूळ दस्तगीर ठाण्यात गेला होता. ‘ठाणेदार अमित वानखडे यांनी आपली फिर्याद ऐकून न घेता आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली,’ असे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे़
विनोदच्या आत्महत्येसाठी ठाणेदार वानखडे हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०६ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी नोंदविण्यात आला. तसेच ज्या व्यक्तीविरूद्ध तक्रार नोंदविण्यासाठी विनोद पोलिस ठाण्यात गेला होता त्याचा जबाब उपविभागीय पोलीस अधिकारी राऊत यांच्या समक्ष नोंदविला जाणार आहे़ तसेच विनोद लवणे याने लिहिलेल्या चिठ्ठीची हस्ताक्षर तज्ज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे.