ठाण्यातील शिवसेनेची सर्वात लहान नगरसेविका

By admin | Published: February 24, 2017 04:06 PM2017-02-24T16:06:59+5:302017-02-24T16:06:59+5:30

केवळ 21 वर्षांची प्रियांका पाटील शिवसेनेची विजयी उमेदवार ठरली आहे. प्रियांका ही ठाणे महापालिकेतील सर्वात लहान नगरसेविका आहे.

Shivsena's smallest corporator in Thane | ठाण्यातील शिवसेनेची सर्वात लहान नगरसेविका

ठाण्यातील शिवसेनेची सर्वात लहान नगरसेविका

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 24 -  केवळ 21 वर्षांची प्रियांका पाटील शिवसेनेची विजयी उमेदवार ठरली आहे. प्रियांका ही ठाणे महापालिकेतील सर्वात लहान नगरसेविका आहे. शिवसेनेतर्फे प्रभाग 24 ब मधून ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. या प्रभागातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अटीतटीच्या लढतीत प्रियांका पाटीलने बाजी मारली.  2,500 मतांनी तिचा विजय झाला. 
 
प्रियांका सध्या डोंबिवलीतील जोंधळे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तसं पाहायला गेले तर प्रियांकाचे कुटुंबीयदेखील राजकारणात आहेत. प्रियांकाचे वडील शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत, तर काका ठाण्याचे माजी महापौर होते. मात्र तीन अपत्य असल्याने तिच्या वडिलांना इच्छा असतानाही निवडणूक लढवता आली नाही. या कारणामुळे प्रियांका पाटील यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले.  
 
आणखी बातम्या
(युतीचा अजून विचार केलेला नाही - उद्धव ठाकरे)
('कावळे' म्हणून हिणवलेल्यांची शिवसेनेत घरवापसी)
 

Web Title: Shivsena's smallest corporator in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.