शिवसेनेच्या दहा जणांचे ‘एबी’ फॉर्म झाले रद्द

By admin | Published: February 7, 2017 01:32 AM2017-02-07T01:32:15+5:302017-02-07T01:32:15+5:30

महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा फटका शिवसेनेला बसला असून, दहा उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द

Shivsena's ten AB's forms were canceled | शिवसेनेच्या दहा जणांचे ‘एबी’ फॉर्म झाले रद्द

शिवसेनेच्या दहा जणांचे ‘एबी’ फॉर्म झाले रद्द

Next

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा फटका शिवसेनेला बसला असून, दहा उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द ठरविल्याने त्यांना अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. तथापि, शिवसेनेने त्यांना आता पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला असून, तशी माहिती पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी सोमवारी दिली. दरम्यान, उमेदवारी वाटपाचा आणि एबी फॉर्म देण्याच्या घोळाला त्यांनी तांत्रिक दोष संबोधून या प्रकाराची चौकशी करण्याचे टाळले.
महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने मुंबईहून मुखपत्रात यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर एबी फॉर्म दिले जातात, अशी पद्धत असताना यंदा शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी घोळात ठेवण्यात आली आणि अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३ फेबु्रवारीला यादी घोषित करण्यात आली. त्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना अनेक घोळ झाले. काही ठिकाणी वेळेत अर्ज पोहोचले नाहीत, तर काही ठिकाणी झेरॉक्स फॉर्म देण्यात आले. सिडकोतील एका प्रभागात तर चार उमेदवार आणि प्रत्यक्षात शिवसेनेचे आठ एबी फॉर्म देण्यात आले. या घोळानंतर पंचवटीमधील प्रभाग ४मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी कोरे एबी फॉर्म दिले होते. छाननीत ते बाद करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्रमांक ३०मध्ये मूळ एबी फॉर्म न जोडता झेरॉक्स जोडण्यात आले होते. तर सिडकोत प्रभाग २९मध्ये चार उमेदवार असताना सात उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्या वेळी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निकषावर दीपक बडगुजर, भूषण देवरे, रत्नमाला राणे, सुमन सोनवणे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके, सतीश खैरनार, माधुरी खैरनार यांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले. या घोळाची चौकशी करण्यासाठी अनिल देसाई नाशिकमध्ये आले होते. घोळ झाल्याचे त्यांनी मान्य केले.

हे आहेत पुरस्कृत उमेदवार
प्रभाग ४मध्ये भगवान भोगे, सविता बडवे, प्रतिभा घोलप, वर्षा गीते, तर प्रभाग ३०मध्ये संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे, रशिदा शेख यांच्या उमेदवारी अर्जासमवेतचे अर्ज बाद ठरल्याने त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. प्रभाग २९मध्ये शिवसेनेने डबल एबी फॉर्म दिल्याने घोळ निर्माण झाला होता. मात्र, त्यातही आता शिवसेनेचे देसाई यांनी मनसेचे विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके आणि सतीश खैरनार यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.
या प्रभागात शिवसेनेचे एबी फॉर्म असलेले अन्य उमेदवार २९मध्ये दीपक बडगुजर आणि भूषण देवरे हे माघार घेणार आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shivsena's ten AB's forms were canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.