Maharashtra Politics Video: विनायक राऊत, भावना गवळी एकाच ट्रेनमध्ये; पाहताच ठाकरे गटाकडून 'गद्दार गद्दार' घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:56 PM2022-11-22T22:56:54+5:302022-11-22T22:57:58+5:30
Bhavana Gawli Vs Vinayak Raut: अकोला रेल्वेस्थानकावर शिंदे गटाच्या भावना गवळी, ठाकरे गटाचे विनायक राऊत एकाचवेळी आले...
शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी अकोला रेल्वे स्थानकावर एकाचवेळी आले होते. यावेळी भावना गवळींना पाहून शिंदे गटाने गद्दार, गद्दार अशी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
दोन्ही खासदार विदर्भ एक्स्प्रेसने दोन्ही खासदार मुंबईकडे निघाले होते. यावेळी विनायक राऊत यांना सोडण्यासाठी काही कार्यकर्ते, पदाधिकारी रेल्वेस्थानकावर आले होते. तर त्याच्या शेजारच्याच डब्यातून भावना गवळी उतरून पुढच्या डब्यात जात होत्या. विनाय राऊत कार्यकर्त्यांना हाताने निरोप देत असताना भावना गवळीकडे काहींचे लक्ष गेले.
अकोला रेल्वेस्थानकावर शिंदे गटाच्या भावना गवळी, ठाकरे गटाचे विनायक राऊत एकाचवेळी आले... #BhavanaGavli#VinayakRaut#Shivsena#Akolapic.twitter.com/pA9l5LlyVV
— Lokmat (@lokmat) November 22, 2022
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुलडाण्यातील सभेच्या नियाेजनासाठी आलेले शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी बुलडाण्यात आढावा घेतला. त्यानंतर ते संध्याकाळी अकाेल्यात येऊन विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकाेला स्थानकावर आले हाेते त्यांना निराेप देण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांनी माेठी गर्दी केली हाेती, स्थानकावर गाडी आल्यानंतर राऊत हे गाडीच्या दरवाज्यात उभे राहून शिवसैनिकांना नमस्कार करत असतानाच त्याच गाडीने मुंबईला जाण्यासाठी वाशीमच्या खासदार भावना गवळी स्थानकावर आल्या. त्यांच्याकडे पाहत शिवसैनिकांनी खासदार गद्दार,इडी अशा घाेषणा देत एकच गदाराेळ केला. गवळी यांनी गाडीच्या दरवाज्यात उभे राही पर्यंत घाेषणाकडे दूर्लक्ष केले मात्र दरवाज्यात उभे राहून त्यांना निराेप देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला काही सूचना देऊन गाडी मध्ये प्रवेश केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने स्थानकावर गाेंधळ माजला हाेता.