भाडेतत्त्वावरील शिवशाही बस बंद होण्याच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:29 AM2019-08-07T05:29:02+5:302019-08-07T05:29:19+5:30

आर्थिक धोरणांचा परिणाम; मालकांना एका किमीमागे मिळतात केवळ १३ ते १८ रुपये

Shivshahi bus on lease is on its way! | भाडेतत्त्वावरील शिवशाही बस बंद होण्याच्या मार्गावर!

भाडेतत्त्वावरील शिवशाही बस बंद होण्याच्या मार्गावर!

googlenewsNext

मुंबई : दंडात्मक कारवाई आणि अनियोजित आर्थिक धोरणामुळे भाडेतत्त्वावरील शिवशाही बस बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या ताफ्यात फक्त एसटीच्या मालकीच्या शिवशाही राहण्याची चिन्हे आहेत.

शिवशाही बसमालकांना एका किमीमागे १३ ते १८ रुपये मिळतात. मात्र बाहेरील राज्यात एका किमीमागे ३५ ते ४८ रुपये मिळतात. त्यामुळे बसमालक एसटीच्या या अनियोजित आर्थिक धोरणाला वैतागले आहेत. नुकताच खासगी शिवशाही पुरवठादारांपैकी दोन मालकांनी भाडेतत्त्वावरील बस न चालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाडेतत्त्वावरील ६३ बस कमी झाल्या आहेत. यासह इतर खासगी बसमालकांकडून महामंडळाच्या धोरणामुळे शिवशाही बसचा पुरवठा कमी केला जाण्याची शक्यता आहे. महामंडळाकडून नियोजित करून दिलेला किमीचा प्रवास पूर्ण करणे भाडेतत्त्वावरील शिवशाहीला बंधनकारक आहे. यासह नियोजित फेऱ्यांऐवजी कमी फेºया झाल्यास भाडेतत्त्वावरील शिवशाहीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाºयाने दिली.
शिवशाहीची लोकप्रियता ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त आहे. दोन शहरांमध्ये शिवशाहीच्या फेºया जास्त प्रमाणात चालविण्यात येतात. मात्र अपघात आणि इतर तांत्रिक बाबींमुळे शिवशाही बसच्या लोकप्रियतेला धोका निर्माण झाला आहे.

भाडेतत्त्वावरील ४५० शिवशाही
महामंडळाच्या ताफ्यात एकूण ९५० शिवशाही आहेत. यात एसटी महामंडळाच्या स्वमालकीच्या ५०० आणि भाडेतत्त्वावरील ४५० शिवशाही बस आहेत. मात्र ६३ बस कमी झाल्याने आता महामंडळाकडे भाडेतत्त्वावरील ३८७ बस आहेत.

Web Title: Shivshahi bus on lease is on its way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.