बोईसर ग्रामपंचायतीवर शिवशक्ती-भाजपची सत्ता

By admin | Published: July 19, 2016 03:46 AM2016-07-19T03:46:52+5:302016-07-19T03:46:52+5:30

बोईसर ग्रामपंचातीच्या सरपंचपदी शिवशक्ती या सामाजिक संघटनेच्या वैशाली बाबर यांची तर भाजपाचे राजेश करविर यांची उपसरपंचपदावर निवड झाली.

Shivshakti-BJP rule on Boisar Gram Panchayat | बोईसर ग्रामपंचायतीवर शिवशक्ती-भाजपची सत्ता

बोईसर ग्रामपंचायतीवर शिवशक्ती-भाजपची सत्ता

Next


बोईसर : बोईसर ग्रामपंचातीच्या सरपंचपदी शिवशक्ती या सामाजिक संघटनेच्या वैशाली बाबर यांची तर भाजपाचे राजेश करविर यांची उपसरपंचपदावर निवड झाली. या निवडणूकीमध्ये दोन्ही विजयी उमेदवारांना प्रत्येकी दहा तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रत्येकी सात मते मिळाली.
सतरा सदस्य संख्या असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये संजय पाटील यांच्या शिवशक्ती सामाजिक संघटना भाजपा व बसपा अशी युती होऊन त्या युतीने दहा जागांवर, शिवसेनेचे चार, बविआने दोन तर एक अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला होता तर यापूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता बोईसर ग्रामपंचायतीवर होती.
अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी शिवशक्ती-भाजपा युतीच्या वतीने वैशाली बाबर तर शिवसेना बविआ युतीच्या वतीने अलका धोडी यांनी निवडणूक लढविली त्यामध्ये बाबर यांना दहा तर धोडी यांना सात मते मिळाली तर उपसरपंचपदाकरीता भाजपा-शिवशक्ती युतीच्या वतीने राजेश करविर तर शिवसेना-बविआ युतीच्या वतीने निलम संखे यांनी निवडणूक लढविली त्यामध्ये करविर यांना दहा तर संखे यांना सात मते मिळाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता राजेश पाध्ये यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
>यांची भूमिका महत्त्वाची
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शिवशक्ती संघटनेच्या वतीने संजय ज. पाटील भाजपाच्या वतीने अर्चना वाणी, अशोक वडे व महावीर जैन तर बसपाच्या वतीने सुरेश जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
खानिवडेत गैला सरपंच/घरत उपसरपंच अविरोध
वसई पूर्व भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी सुनिल गैला सरपंच तर उपसरपंच राजेद्र मधुकर घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडी आपले वर्चस्व कायम ठेवले, या वेळी पक्षाकडून माजी खा बळीराम जाधव व जि. प. सदस्य कल्याणी तरे तर निवडणूक अधिकारी म्हणून जे. बी. पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Shivshakti-BJP rule on Boisar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.