शिवस्मारकाचा खर्च ३६०० कोटींवर
By Admin | Published: October 27, 2016 04:58 AM2016-10-27T04:58:18+5:302016-10-27T04:58:18+5:30
अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा खर्च आता ३६०० कोटी रुपयांवर गेला आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामापोटी राज्य
मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा खर्च आता ३६०० कोटी रुपयांवर गेला आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामापोटी राज्य सरकारने निविदा काढल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बोटावर मोजण्याइतक्या वृत्तपत्रांत ती छापूनही आली. आता ती अन्यत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे.
२००९ मध्ये या स्मारकाचा खर्च ७०० कोटी रुपये इतका होता. २०१२ मध्ये या स्मारकासाठी निविदा काढण्यात आली होती, पण प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही. हे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. एकूण १५.९६ हेक्टर जागेवर भराव घालून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन येत्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्मारकासाठी ३६०० कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केलेली नाही, पण शिवरायांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१५.९६ हेक्टर जागेवर भराव घालून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.