श्लोक प्रदर्शन आजपासून

By Admin | Published: January 11, 2015 12:54 AM2015-01-11T00:54:36+5:302015-01-11T00:54:36+5:30

प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ च्या चित्रप्रदर्शनाला रविवार, दि. ११ जानेवारीपासून नागपुरात प्रारंभ होत आहे.

Shloka Demonstrations Today | श्लोक प्रदर्शन आजपासून

श्लोक प्रदर्शन आजपासून

googlenewsNext

दर्डा आर्ट गॅलरीत आयोजन : वासुदेव कामत यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ च्या चित्रप्रदर्शनाला रविवार, दि. ११ जानेवारीपासून नागपुरात प्रारंभ होत आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.कलावंतांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘श्लोक’ या कलात्मक चळवळीला अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच श्लोकच्या प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी कलारसिकांमध्ये कुतूहल असते. ‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे.
कलाकृती रसिकांना भुरळ पाडणार
शीतल ऋषी दर्डा यांच्या कल्पनेतूनच या प्रदर्शनाला प्रारंभ झाला आणि अल्पावधीत या प्रदर्शनाने कलारसिकांचे लक्ष वेधले आहे. जागतिक स्तरावरही ‘श्लोक’ चित्र प्रदर्शनाची दखल घेण्यात आली आहे. या प्रदर्शनात वैदर्भीय कलावंतांच्या उत्तमोत्तम कलाकृती रसिकांना भुरळ पाडणार आहेत.
चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, श्लोकच्या संचालक शीतल ऋषी दर्डा उपस्थित राहतील. याप्रसंगी वासुदेव कामत यांचे कला आणि कलेचा पौराणिक संदर्भ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यानंतर दुपारी १२ वाजता ते ‘पोर्ट्रेट’ चे प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत. कलारसिकांसाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभविणे ही पर्वणीच असणार आहे.
या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. आलेल्या कलाकृतीतून निवडण्यात आलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. यात वय वर्षे ६ ते वयाची ७१ वर्षे झालेल्या निवृत्त कलाशिक्षकांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shloka Demonstrations Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.