शोभा राठोड ठरल्या कारच्या मानकरी
By admin | Published: January 10, 2015 01:34 AM2015-01-10T01:34:59+5:302015-01-10T01:34:59+5:30
लोकमत सखीमंच वर्ष २०१४च्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय लक्की ड्रॉ अंतर्गत लातूरच्या शोभा राठोड या ह्युंदाई आयटेन या कारच्या मानकरी ठरल्या आहेत़
लातूर : लोकमत सखीमंच वर्ष २०१४च्या सदस्यांसाठी राज्यस्तरीय लक्की ड्रॉ अंतर्गत लातूरच्या शोभा राठोड या ह्युंदाई आयटेन या कारच्या मानकरी ठरल्या आहेत़ लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्या हस्ते मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात शोभा राठोड यांच्याकडे कारची चावी सुपूर्द करण्यात आली़ याप्रसंगी द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, राजभोग आटाचे विजय केंद्रे, मनोजा एजन्सीजच्या निकिता ब्रिजवासी, लोकमतचे सरव्यवस्थापक रमेश तावडे, शाखा व्यवस्थापक नितीन खोत आदी उपस्थित होते़
प्रारंभी लोकमतचे सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी सखीमंच व्यासपीठ उभारणीची भूमिका विशद केली़ सखीमंच हे महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आहे़ महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख सखीमंच सदस्यांमधून लातूरच्या शोभा राठोड या मानकरी ठरल्या आहेत़ त्यामुळे हा बहुमान सर्व लातूरच्या सखीमंच सदस्यांचा असल्याचे ते म्हणाले़
सत्कारास उत्तर देताना शोभा राठोड म्हणाल्या, लोकमत सखीमंचचे व्यासपीठ महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करते़ महिलांचे प्रश्न सोडविणयासाठी हक्काचे व्यासपीठ आहे़ कला-साहित्य-संगीत-मनोरंजन आदी क्षेत्रासह सामाजीक क्षेत्रातही सखीमंच व्यासपीठ भरीव कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले़ या कार्यक्रमास लातूर जिल्ह्णातील सखीमंच सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़