‘शॉक’ लागून खांबावरच गतप्राण झाला ‘जनमित्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:06 PM2017-08-17T16:06:35+5:302017-08-17T16:20:41+5:30

नाशिक शहरामधील इंदिरानगर भागात सकाळच्या सुमारास वीजपुरवठ्यामधील बिघाड दुरूस्तीसाठी महावितरणच्या खांबावर चढलेला कर्मचारी (जनमित्र) ‘शॉक’ लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक दुर्देवी घटना

 'Shock' collapsed on a pillar, 'Janmitra' | ‘शॉक’ लागून खांबावरच गतप्राण झाला ‘जनमित्र’

‘शॉक’ लागून खांबावरच गतप्राण झाला ‘जनमित्र’

Next
ठळक मुद्देमहावितरणच्या खांबावर चढलेला कर्मचारी (जनमित्र) ‘शॉक’ लागून जागीच गतप्राण खांबावर बसून जीवाची पर्वा न करता तोंडात तोंड घालून कृत्रीम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न सुरू केलापंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत श्वासोच्छवास दिला गजानन प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने वाघ यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परिसरातील विदयुत पुरवठा बंद करुन बिघाड दुरूस्तीचे काम हातीरोहित्रावरुन विजपुरवठा पुन्हा कसा सुरू झाला व कोणी सुरू केला? हा प्रश्न

नाशिक : नाशिक शहरामधील इंदिरानगर भागात सकाळच्या सुमारास वीजपुरवठ्यामधील बिघाड दुरूस्तीसाठी महावितरणच्या खांबावर चढलेला कर्मचारी (जनमित्र) ‘शॉक’ लागून जागीच गतप्राण झाल्याची धक्कादायक दुर्देवी घटना घडली. या घटनेने संपुर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
इंदिरानगरमधील मोदकेश्वर चौकातील देवदत्त सोसायटीचा वीजपुरवठ्याचा बिघाड दुरूस्तीची तक्रार निवारण करण्यासाठी वीज वितरण कर्मचारी समीर वाघ (२६), हेमराज कडेकर (३५) हे दोघे दाखल झाले. दरम्यान, वाघ हे बिघाड दुरूस्तीसाठी खांबावर चढले. त्यावेळी वीजप्रवाह सदर भागात बंद करण्यात आलेला होता. हेमराज हे खांबाजवळ उभे होते. काही मिनिटे झाल्यानंतर अचानकपणे या भागातील वीजपुरवठा सुरू झाल्याने खांबावर दुरूस्ती करणाºया वाघ यांना वीजेचा झटका बसला. त्यावेळी त्यांनी जीवाच्या आक ांताने ओरडले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर हेमराज यांनी तत्काळ भ्रमणध्वनीवरून वीजप्रवाह का सुरू केला ? तातडीने बंद करा काम सुरू असून ‘जनमित्र’ला शॉक लागला आहे, असे कळविले’ त्यावेळी तातडीने पुन्हा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि हेमराज यानंी शिडीवरून खांब गाठला. यावेळी त्यांनी खांबावर बसून जीवाची पर्वा न करता तोंडात तोंड घालून कृत्रीम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न सुरू केला. पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत श्वासोच्छवास दिला. दरम्यान, घटनेची माहिती इंदिरानगर पोलीस ठाणे, अग्निशमन मुख्यालयास नागरिकांकडून कळविण्यात आली. क्षणार्धात पोलीस व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. मोठ्या शिडीच्या साहाय्याने हेमराज व जवानांनी अत्यवस्थ अवस्थेत वाघ यांना खाली आणले. गजानन प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने वाघ यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाºयांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.



वीजप्रवाह कसा सुरू झाला?
वीज कर्मचाºयांनी त्या परिसरातील विदयुत पुरवठा बंद करुन बिघाड दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये रोहित्रावरुन विजपुरवठा पुन्हा कसा सुरू झाला व कोणी सुरू केला? हा प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चीला जात होता. कारण वीज पुरवठा बंद करुन वाघ व कडेकर विद्युत खांबाजवळ आले होते. दरम्यान, वाघ खांबावर चढले आणि काही मिनिटांत पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला आणि वाघ यांचा यामुळे मृृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



अशी घडली घटना....
१० : ३० वा. देवदत्त सोसायटीजवळ जनमित्र दाखल झाले.

१०:३५ वा. समीर वाघ विद्युत खांबावर चढला.

१० : ५० वा. दुरूस्तीचा बिघाड सुरू असताना वीजपुरवठा सुरू झाला आणि वाघ यांना शॉक लागला.

११ :०० वा. वाघ यांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर कडेकर यांनी भ्रमणध्वनीवर कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरू का के ला? बंद करा..सांगून तातडीने शिडीवरून पोली गाठले.

११:०५ वा. कडेकर यांनी वाघ यांना तोंडाद्वारे कृत्रीम श्वासोच्छवास जागीच देण्यास सुरूवात केली.

११: ०८ वा. सदर चित्र बघून काहीतरी अनुचित घडल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलीस व अग्निशामक दलाला माहिती कळविली.

११: १५ : वा. पोलीसांसह अग्निशामक दलाचा सिडको उपकेंद्राचा बंब व जवान घटनास्थळी दाखल.

 

Web Title:  'Shock' collapsed on a pillar, 'Janmitra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.