वसतिगृहांना जादा वीजदराचा शॉक, वीजतज्ज्ञ हाेगाडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 06:23 AM2020-12-21T06:23:18+5:302020-12-21T06:23:40+5:30

information of electricity expert Haegade : वीज आयोगाने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश ३० मार्च, २०२० रोजी जाहीर केले.

Shock of extra electricity tariff to hostels, information of electricity expert Haegade | वसतिगृहांना जादा वीजदराचा शॉक, वीजतज्ज्ञ हाेगाडे यांची माहिती

वसतिगृहांना जादा वीजदराचा शॉक, वीजतज्ज्ञ हाेगाडे यांची माहिती

Next

मुंबई : खासगी व सार्वजनिक वसतिगृहांना १ एप्रिलनंतरही सार्वजनिक सेवा या सवलतीच्या वीजदराऐवजी जुन्या लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी होत आहे. या ग्राहकांनी हरकती नोंद कराव्यात. हरकतीची पोहोच घेतलेली प्रत व अंतिम बिलाची प्रत संघटनेकडे पाठवावी, असे आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.
वीज आयोगाने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश ३० मार्च, २०२० रोजी जाहीर केले. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा, शासकीय अथवा सार्वजनिक सेवा, अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी १ एप्रिलपासून सुरू होणे आवश्यक होते. वसतिगृहे, खासगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न विद्यार्थी वसतिगृहांबाबत आदेशात त्रुटी असल्याने अजूनही लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी सुरू आहे. या त्रुटी दूर करून योग्य आकारणी लागू करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

‘सवलत लागू झाली नसल्यास हरकत नोंदवा’
सर्व वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय किंवा सार्वजनिक सेवा अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी सुरू केली, असा दावा महावितरणने केला. परंतु लघुदाब घरगुती वीजदराने आकारणी होत आहे. अशी माहिती व पुरावे आयोगासमोर दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी सवलतीचा दर लागू झालेला नसल्यास हरकत नोंद करावी, असे स्पष्ट केले. 
या वर्गवारीमध्ये शाळा व महाविद्यालयांशी संलग्न सर्व वसतिगृहे, संलग्न नसलेली अन्य विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी पुरुष, महिला, निराधार अनाथ व दिव्यांग वसतिगृहे, मनोरुग्ण व बाल सुधारगृहे, धर्मशाळा, निर्वासित, आपदग्रस्त छावण्या व अनाथाश्रम वसतिगृहांचा समावेश आहे.

Web Title: Shock of extra electricity tariff to hostels, information of electricity expert Haegade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.