धक्कादायक! नाशिकमध्ये 177 कोटींचा धान्य घोटाळा, ईडीने केली तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 02:12 AM2021-02-20T02:12:20+5:302021-02-20T06:38:24+5:30

177 crore grain scam in Nashik : या तिघांनी रेशन दुकानातील सुमारे १७७ कोटी रुपयांच्या ३० हजार क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे.

Shocking! 177 crore grain scam in Nashik, ED arrests three | धक्कादायक! नाशिकमध्ये 177 कोटींचा धान्य घोटाळा, ईडीने केली तिघांना अटक

धक्कादायक! नाशिकमध्ये 177 कोटींचा धान्य घोटाळा, ईडीने केली तिघांना अटक

googlenewsNext

नागपूर : सक्त वसुली संचालनालयाच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी काळा पैसा प्रतिबंधक कारवाई अंतर्गत घोरपडे बंधूंना अटक केल्याने सहा वर्षांपूर्वीच्या धान्य घोटाळ्याच्या प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी रेशन दुकानातील सुमारे १७७ कोटी रुपयांच्या ३० हजार क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे.
२०१५ मध्ये हा घोटाळा उघड झाला होता. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात मनमाडमध्ये अन्न महामंडळाचे गोदाम असून, तेथे येणारा माल नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील रेशन गोदामांमध्ये पोहोचविण्यासाठी वाहतूक ठेकेदार म्हणून घोरपडे काम करीत होते. मनमाड येथील या गोदामामधील काही अधिकारी आणि हमालांना हाताशी धरून आलेल्या धान्य पोत्यांतील माल गायब करण्याचे काम ही मंडळी करीत होती. त्यामुळे रेशन दुकानांसाठी बांधलेल्या तालुक्यांच्या स्तरावरील गोदामांमध्ये माल पोहोचत नव्हता. मात्र त्यानंतरही सारे आलबेल सुरू होते. राज्य शासनाच्या एका पथकाने सुरगाणा येथे अचानक गोदामाला भेट दिली तेव्हा तेथील गोदामात ३० हजार क्विंटल धान्य कागदोपत्री दिसत होेते; परंतु प्रत्यक्षात तेथे उंदीर फिरत होते. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर एकेक कंगोरे उलगडत गेले.
नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणचे धान्य गोदामात आलेला माल तपासण्यासाठी जबाबदारी वेगवेगळ्या तालुक्यातील तहसीलदारांवर होती. त्यामुळे खरी माहिती कळेल अशी शासनाची व्यवस्था होती. परंतु प्रत्यक्षात हे तहसीलदार गोदाम तपासणीसाठी कधीच जात नव्हते असे आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते.

धान्य माफियांवर मोक्का
 याच काळात सिन्नर येथील गोदामामधील धान्य वाडीवऱ्हे येथे घोटी-सिन्नरमार्गे नेत असताना पोलिसांनी एक टेम्पाे पकडला. हा टेम्पो घोरपडे यांच्या मालकीचा असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी मग अधिक खोलाने कारवाई सुरू केली. त्यानंतर राज्य विधिमंडळात हा विषय गाजला. त्यावेळी धान्य माफियांवर मोक्का लावण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार कारवाई देखील झाली आहे.

Web Title: Shocking! 177 crore grain scam in Nashik, ED arrests three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.