धक्कादायक ! 40 हजारांच्या आयफोनच्या जागी पाठवले कागद

By admin | Published: March 12, 2017 07:43 AM2017-03-12T07:43:10+5:302017-03-12T07:48:27+5:30

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

Shocking 40,000 pages of iphone sent to the place | धक्कादायक ! 40 हजारांच्या आयफोनच्या जागी पाठवले कागद

धक्कादायक ! 40 हजारांच्या आयफोनच्या जागी पाठवले कागद

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मिस्त्री नामक एका व्यक्तीनं खोटे फोटो टाकून 40000 आयफोन 6 एसची जाहिरात दिली होती. ती पाहून एका मुलानं सोशल साइटवरून आयफोन 6 एसची ऑर्डर दिली होती. विशेष म्हणजे 2016मध्ये हा आयफोन याच्या दुप्पट किमतीत मिळत होता. आयफोन 6 एसचं आलेलं पार्सल अक्षय अवसारे या तरुणानं खोललं, त्यानंतर त्याला धक्काच बसला. पार्सलच्या बॉक्समध्ये फोनच्या जागेवर 4 कागदाचे तुकडे ठेवण्यात आल्याचं अक्षयच्या निदर्शनास आलं. अक्षयनं लागलीच या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी 11 महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा केला आणि मिस्त्रीला कोलकात्यातील केस्तोपूरमधून आठवड्याभरातच अटक केली. पोलिसांनी मिस्त्रीच्या बँक अकाऊंटचीही चौकशी केलीय. त्यानंतर मिस्त्रीकडून अनेक बँकांचे डेबिट कार्ड आणि मोबाईल सिम कार्ड आढळून आल्यानं ते पोलिसांनी जप्त केले. मिस्त्री लोकांना वेगवेगळे अकाऊंट नंबर देऊन त्यात पैसे टाकण्याचं सांगून ठकत होता.

मुंबईतल्या अवसारेनंही मिस्त्रीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवत त्याच्या अकाऊंटमध्ये 34 हजार रुपये टाकले. त्यानंतर त्याला आयफोन 6 एसच्या बदल्यात चार कागदाचे तुकडे देण्यात आले. 4 हजार रुपये वसूल करण्यासाठी तो अक्षयला भेटला असता पोलिसांनी त्याला अटक केली. मिस्त्री अशीच बनावट कागदपत्रे गोळा करून बँक अकाऊंट खोलून लोकांना फसवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. मिस्त्रीविरोधात पोलिसांनी आयपीसी सेक्शन 419, 420 आणि 66 डीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टानं 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Shocking 40,000 pages of iphone sent to the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.