धक्कादायक - नाशिकच्या बालसुधारगृहातून १२ बालगुन्हेगारांचे पलायन
By Admin | Published: January 11, 2016 05:22 PM2016-01-11T17:22:30+5:302016-01-11T17:22:30+5:30
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तुरुंगासारखाच चोख बंदोबस्त असूनही लोखंडाचे गज कापून व १६ फूटांची भिंत ओलांडून ही मुलं पळून गेल्याचे वृत्त आहे.
शहराच्या अगदी मध्यवस्तीत हे सुधारगृह आहे. तिथली सुरक्षा तुरुंगाप्रमाणेच चोख असते व भोवती १६ फूटांची भिंतही आहे. या बालगुन्हेगारांना रात्री लॉकअपमध्ये ठेवलं जातं
आज पहाटे लॉपअपचे काही गज कापल्याचं सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मुंबई, पणे, सातारा अशा विविध ठिकाणच्या १२ बालगुन्हेगारांनी पोबारा केल्याचे लक्षात आले.
पलायन केलेले बालगुन्हेगार १६ ते १८ वयोगटातले आहेत व त्यांच्यावर खून, दरोडे, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत.