धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 08:47 PM2018-12-19T20:47:27+5:302018-12-19T20:57:39+5:30

मद्यपान केल्यानंतर भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

Shocking incident: man getting jump from eighth floor | धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी !

धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी !

Next

पुणे : मद्यपान केल्यानंतर भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.ही घटना मंगळवार  (दि.१८) रात्री  साडेदहाच्या सुमारास लोहगाव येतील जिनीबेलीना सोसायटीमध्ये घडली.

                 अर्णव तुहीनेनदूर मुखोपाध्याय (वय 36, जिनीबेलीना सोसायटी लोहगाव) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान अर्णव यांनी मृत्यपूर्वी कबुतराच्या तब्बल आठ अंड्यांचे सेवन केल्याचे समोर आले आहे. 
                               या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ कोलकत्याचे रहिवासी असलेले अर्णव मुखोपाध्याय हे एका सेल्यूलर कंपनीमध्ये नोकरी करत होते. ते लोहगाव पत्नीसह राहतात. त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार मागील दोन दिवसांपासून ते तणावाखाली होते.मंगळवारी घरात मद्यप्राशन केले होते. कबुतराच्या अंड्यांचे ऑम्लेट खाल्ल्यामुळे त्यांनी अचानक मला भूत दिसत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर घरात आरडाओरडा करत त्यांनी हातात सूरी घेऊन त्या भुताचा पाठलाग सुरु केला.त्यांच्या आक्रमक पवित्र्याला पत्नी आवरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला आणि खाली उडी मारली. ही उडी इतकी उंचावरून होती की ते खाली उभ्या असलेल्या चारचाकीवर धडकून जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्येची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली. 

Web Title: Shocking incident: man getting jump from eighth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.