धक्कादायक : मारिया, सदानंद दातेंना ठरवले शहीद, नगरसेवकांची जिवंत पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:24 IST2017-11-30T06:24:14+5:302017-11-30T06:24:17+5:30
२६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

धक्कादायक : मारिया, सदानंद दातेंना ठरवले शहीद, नगरसेवकांची जिवंत पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली
वसई : २६/११ मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकाने लावलेल्या बॅनरवर चक्क राकेश मारीया, सदानंद दाते यांचे फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सचिन देसाई यांनी आपल्या मोबाईल नंबरवरून वसई ग्रीन क्लीन वसई ग्रुपवर शहीद अधिकाºयांना श्रद्धांजली वाहणारा बॅनर टाकला आहे. त्यात शहीदांच्या रांगेतून हेमंत करकरे यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्याऐवजी सध्या हयात असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारीया आणि सदानंद दाते यांचा फोटो टाकण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये अनेक पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सभापती, नगरसेवक, विविध पक्षांचे पुढारी, समाजसेवक, पत्रकार आहेत. त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही.
मात्र मनसेचे नालासोपारा शहर सचिव राज नागरे यांना हा प्रकार लक्षात येताच निषेध नोंदवला. याप्रकरणी देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी देसाई यांनी माफी मागण्याची मागणी केली असता पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर देसाई यांनी याप्रकरणी माफी मागून अशी चुक पुन्हा करणार नाही, याची ग्वाही दिली.