धक्कादायक वास्तव! राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:57 AM2022-12-07T07:57:25+5:302022-12-07T07:57:58+5:30
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद वाढत असतानाच आता राज्यातील अनेक गावांनी इतर राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केलीय.
मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील गावांची खदखद आता व्यक्त होऊ लागली आहे. सातपुड्यातील चार गावांना मध्य प्रदेशात जायचंय : जळगाव जामोद तालुक्यातील (जि. बुलढाणा) महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या चार गावांतील नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन देणार आहेत.
सांगली - (सर्व ता. जत) जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी, माडग्याळ, लकडेवाडी, अंकलगी, अंकलगी तांडा, निगडी बुद्रुक, उमदी, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बालगाव, बेळोंडगी, करजगी, बोर्गी, बोर्गी बुद्रुक, अक्कळवाडी, माणिनाळ, गुलगुंजनाळ, मोरबगी, भिवर्गी, कोंत्येवबोबलाद, करेवाडी, तिकोंडी, कागनरी, खंडनाळ, संख, दरीबडची, दरीबडची तांडा, मुचंडी, रावळगुंडवाडी, खोजानवाडी, उमराणी, सिंदूर, बसरगी, गुगवाड, साळमळगेवाडी, वज्रवाड, बिळूर, मेंढेगिरी, वळसंग, कोळगिरी, गुड्डापूर, आसंगी तुर्क, आसंगी बाजार, पांडोझरी, लवंगा, गिरगाव.
नांदेड - देगलूर तालुका - १३ गावे : होट्टल, येरगी, नागराळ, भक्तापूर, बागन टाकळी, हनुमान हिप्परगा, नरंगल, सावरगाव, सांगवी उमर, मेदनकल्लूर, तमलूर, शेवाळा, शेळगाव, नंदूर । बिलोली तालुका - १५ गावे : थडी हिप्परगा, दौलतापूर, सगरोळी, बोळेगाव, येसगी पुनर्वसन, कार्ला बु. पुनर्वसन, कार्ला बु. जुने गाव, कार्ला खुर्द पुनर्वसन, कार्ला खुर्द जुनेगाव, बावलगाव, गंजगाव, माचनूर, नागणी, हुनगुंदा ।
धर्माबाद तालुका - १९ गावे : बन्नाळी, नायगाव ध, बोल्लूर खु., बेल्लूर बु. येवती, येताळा, जुन्नी, हस्नाळी, राजापूर, चिंचोली, बाभळी, शेळगाव, माश्टी, संगम, मनूर, बामणी, ईळेगाव, सिरसखोड, जाखलापूर । उमरी तालुका - २ गावे : बोथी, तुराटी । किनवट तालुका - १७ गावे : अप्पारावपेठ, गोंडेमहागाव, गोंडजेवली, चिखली ई., कंचली, मारलागुंडा, तोटंबा, तोटंबा तांडा, मानसी नाईक तांडा, आंदबोरी ई., व्यंकटरमण तांडा, मलकजाम, मलकजाम तांडा, ईंजेगाव, सिनगारवाडी, सुंगागुडा, पिंपरहोडी
चंद्रपूर - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावे - परमडोली, मुकदमगुडा, कोठा (बुज), महाराजगुडा, अंतापूर, येस्सापूर, लेंडिगुडा, पळसगुडा ही आठ महसुली गावे आणि परमडोली तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, पदमावती, इंदिरानगर, भोलापठार ही सहा गुडे/पाडे.
एकूण किती गावे तेलंगणात जाण्यासाठी आग्रही : २
गावांची नावे - महाराजगुडा येथील १६ नागरिक व परमडोली तांडा येथील काही नागरिक (महाराष्ट्रात एन. टी. व तेलंगणात एस.टी. प्रवर्गात मोडणारे) (ता. जिवती)
सोलापूर - अक्कलकोट तालुका - २३ गावे - तडवळ, आळगी, अंकलगी, म्हैसलगी, खानापूर, गुड्डेवाडी, शेगाव, धारसंग, कल्लकर्जाळ, मुंढेवाडी, कोर्सेगाव, केगाव खु., केगाव बु., सुलेरजवळगा, मंगरुळ, देवीकवठा, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., कुडल, शावळ, हिळ्ळी, उडगी, खैराट । दक्षिण सोलापूर तालुका - १० गावे - हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरुर, चिंचपूर, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव.
शेतीसाठी तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी । शेतीपंपांसाठी मोफत वीज । ६० वर्षांवरील व्यक्तीला प्रतिमाह पेन्शन । सवलतीच्या दरात बी-बियाणे व खते । शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी । पाच रुपये किलो दराने ३० किलो तांदूळ । सीमेलगतच्या विद्यार्थ्यांना गडीनाडू प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी व अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश । तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज । अनुदानावर पाइप, खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर, स्प्रिंकलर सेट, ताडपत्री वाटप.
सुरगण्यात सरपंचांचे दोन गट; आंदोलन स्थगित
नाशिक - महाराष्ट्राकडून सुविधा मिळत नसल्याने, गुजरातमध्ये समाविष्ट होण्याच्या प्रश्नावर सरपंचांमध्येच दोन गट पडल्याने गुजरातमध्ये जाण्याची आग्रही भूमिका घेणारे चिंतामण गावित एकाकी पडले. एका गटाने आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली, तर गावित यांच्यासोबत आलेल्या काही सरपंचांनीही महाराष्ट्रात राहणार असल्याचा शब्द दिला.
प्रमुख कारण - महाराष्ट्रात बंजारा समाज एन.टी. प्रवर्गात मोडतो तर तेलंगणात एस.टी. प्रवर्गात. तेलंगणात एस.टी. प्रवर्गातील नागरिकांना प्राधान्याने सुविधा मिळतात. नोकरीत प्राधान्य आहे. विशेष काही जणांना तेलंगणा सरकारने शेतीचे पट्टे दिले आहेत. त्यावर लाभ घेणे सुरू आहे. म्हणून त्यांचा कल तेलंगणाकडे आहे. महाराजगुडा या गावातील काही जण तेलंगणात जाण्यास तयार आहेत.
शाळा, अंगणवाडी, पाणी, ग्रामपंचायत । मुलींच्या लग्नाकरिता १ लाख ११६ रुपये मोफत । मागासवर्गीयांना व्यवसायासाठी दहा लाख रुपये । शेतकऱ्यांना प्रति एकर सरसकट दहा हजार रुपये । विधवा किंवा निराधारांना प्रति महिना दोन हजार रुपये व दिव्यांगांना प्रति महिना तीन हजार रुपये.
तेलंगणात जायचे नाही, पण विकास करा
नांदेड : धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागातील काही गावांनी तेलंगणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता या निर्णयावर सरपंचांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या गटाने तेलंगणात जायचे नाही, परंतु विकास करा, अशी भूमिका घेतली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने मंगळवारी सीमावर्ती भागातील सरपंचांची बैठक घेतली. या बैठकीला २० सरपंच उपस्थित होते.