धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:15 PM2024-01-02T19:15:14+5:302024-01-02T19:15:49+5:30

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Shocking! There is no Kunbi record in the Maratha families of Manoj Jarange Patil and Antarwali Sarati | धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन करत आहेत. तसेच येत्या २० जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच करत आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मराठा समजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, अंबड तालुक्यातील १२ गावांमध्ये केवळ १२७ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तसेच अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. त्याबरोबरच मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही.

दरम्यान, याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी नोंदी सापडल्या नाहीत की त्या जाणूनबुजून मिळवल्या नाहीत, हा प्रश्न आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील समाज आमचाच आहे. एक इंचही मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी ठकावून सांगितले. 

Web Title: Shocking! There is no Kunbi record in the Maratha families of Manoj Jarange Patil and Antarwali Sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.