धक्कादायक! मुंबईत चेंबूरमध्ये सलग तीन दिवस कुत्र्यावर बलात्कार, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 10:50 AM2017-09-16T10:50:43+5:302017-09-16T15:06:11+5:30

सेक्स करण्याच्या तीव्र इच्छेतून अनेक नवीन विकृती जन्म घेत आहेत.  ही मानवी विकृती अत्यंत किळसवाण्यास्तराला पोहोचली आहे.

Shocking Three days in a row in Chembur in Mumbai, the rape of a dog and the accused arrested | धक्कादायक! मुंबईत चेंबूरमध्ये सलग तीन दिवस कुत्र्यावर बलात्कार, आरोपीला अटक

धक्कादायक! मुंबईत चेंबूरमध्ये सलग तीन दिवस कुत्र्यावर बलात्कार, आरोपीला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देचेंबूर नाक्याजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत तो सुरक्षारक्षकाचे काम करायचा. राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करायचा.

मुंबई, दि. 16 - सेक्स करण्याच्या तीव्र इच्छेतून अनेक नवीन विकृती जन्म घेत आहेत.  ही मानवी विकृती अत्यंत किळसवाण्या स्तराला पोहोचली आहे. मुंबईतही अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. माणूस असा कसा वागू शकतो ? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत चेंबूरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केली आहे. डेक्कन क्रॉनिकलने हे वृत्त दिले आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमुळे हे अमानवीय कृत्य उघड झाले.  राम नरेश (41) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चेंबूर नाक्याजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत तो सुरक्षारक्षकाचे काम करायचा. सलग तीन दिवस त्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करायचा. पाच ते सात मिनिट तो कुत्र्यासोबत बाथरुममध्ये असायचा. या सोसायटीच्या सचिव अस्मिता देशमुख यांनी मागच्या काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

राम नरेश दिवसा ऑटोरिक्षा चालवायचे काम करायचा आणि रात्री सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करायचा. त्याला खासगी सुरक्षाकंपनीमार्फत नियुक्त करण्यात आले होते. आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत एफआयआर दाखल झाल्यानंतर चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

अनेक स्थानिक रहिवाशी आणि प्राणी हक्कासाठी काम करणा-या कार्यकर्त्यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला कुर्ला मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. 

कुत्र्यावर लैंगिक अत्याचार झाले असून त्याच्या पार्श्वभागामध्ये प्रचंड वेदना होत आहेत असे वेटर्नरी डॉक्टर्सनी आपल्या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. मागच्या काहीवर्षांपासून भारतात प्राणी अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्राणी हक्कासाठी काम करणारी पेटा संघटनेने राम नरेशला नोकरीला ठेवणा-या सुरक्षा एजन्सीकडे कारवाईची मागणी केली आहे. भारतातच नव्हे जगातही अशा प्रकारे प्राण्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. 

Web Title: Shocking Three days in a row in Chembur in Mumbai, the rape of a dog and the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.