धक्कादायक; वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

By Appasaheb.patil | Updated: July 1, 2019 15:42 IST2019-07-01T15:10:54+5:302019-07-01T15:42:56+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप शिवारातील घटना

Shocking Three people were killed and two injured | धक्कादायक; वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

धक्कादायक; वीज पडून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

ठळक मुद्दे- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप शिवारातील घटना- जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात केले दाखल- पोलीस घटनास्थळी दाखल, मंद्रुप गावावर शोककळा

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय १७), पार्वती मलप्पा कोरे (वय ४४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर रविकांत राजकुमार मुळे (वय ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय ९२) हे दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत महसुल विभागाने दिलेली माहिती अशी की, मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप ते टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली अडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Shocking Three people were killed and two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.