धक्कादायक! एसटी महामंडळात कोरोनाने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:31 PM2020-07-05T21:31:23+5:302020-07-05T22:10:09+5:30
राज्यभरात एसटीचे ११४ कोरोना बाधित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचार्यांना कोरोनाची लागण होत आहे . एसटी मधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. राज्यात एकूण ११४ कर्मचारी कोरोना बाधित झाले. यामध्ये मुंबई विभागात ५६, ठाणे विभागात ३० कर्मचारी बाधित आहेत. ११४ कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एसटी महामंडळांनी दिली आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, मंत्रालय,महापालिका कर्मचाऱ्यांच्या ने- आण करण्यासाठी बेस्ट आणि एसटीच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देताना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची विषाणूची बाधा झाली आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत राज्यात एकूण ११४ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या झाली होती. यामध्ये मुंबई मध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून, त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर येथे ही कोरोना बाधित एसटी कर्मचारी सापडले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह
गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार
राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली