चोरून चकली खाल्ली म्हणून दुकानदाराने लहानग्यांची काढली नग्न धिंड
By admin | Published: May 21, 2017 01:10 PM2017-05-21T13:10:51+5:302017-05-21T14:14:32+5:30
उल्हासनगरमध्ये एका दुकानदाराने न विचारता बिस्कीट खाल्लं म्हणून दोन लहान मुलांची टक्कल करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 21 - उल्हासनगरमध्ये एका दुकानदाराने चोरून चकली खाल्ली म्हणून दोन अल्पवयीन मुलांची टक्कल करून नग्न धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महात्मा फुलेनगर येथे राहणाऱ्या कुणाल(9), रमेश(8), या अल्पवयीन मुलांनी चोरून चकली खाल्याच्या रागातून दुकानदार महमूद पठाण व त्याच्या दोन मुलांनी लहनग्यांचं टक्कल केलं, तसेच गळ्यात चप्पल टाकून धिंड काढल्याचा व्हिडिओ काढून व्हॉट्सअॅपवर टाकला, याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं 5, महात्मा फुलेनगरात राहणाऱ्या कुणाल जानराव व रमेश शिनगारे ही मुले आई-वडिलां सोबत राहत असून ते मोलमजुरीचे काम करतात. मुलांनी महमूद पठाण यांच्या दुकानातून चोरून चकली खाल्ली होती. या रागातून पठाण व त्याची दोन मुले इरफान पठाण व तोकल पठाण यांनी मुलांना बोलावून मारहाण केली. त्यानंतर मुलांना नग्न करून अर्धवट टक्कल केले. गळ्यात चप्पलची माळ टाकून परिसरातून धिंड काढली, त्याचा व्हिडीओ काढून व्हॉटअप वर टाकला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर प्रकार मुलांच्या आई वडिलांना रात्री माहीत होताच, त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भांदवी कलम 375, 323, 504,500,34 तसेच अट्रोसिटी ऍक्ट व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
याप्रकरणी विविध पक्षानी निषेध व्यक्त केला असून भारिप युवा नेते जय गायकवाड यांनी सहकार्याच्या मदतीने पीडित कुटुंबाना सहकार्य केले आहे.