पहाटेच उघडणार दुकाने
By Admin | Published: February 17, 2016 03:25 AM2016-02-17T03:25:20+5:302016-02-17T03:25:20+5:30
राज्यातील किरकोळ विक्रीची दुकाने आता पहाटे ५ वाजता उघडता येईल आणि रात्री ११ वाजता ते बंद करावे लागेल. नवीन किरकोळ व्यापार धोरणात ही परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील किरकोळ विक्रीची दुकाने आता पहाटे ५ वाजता उघडता येईल आणि रात्री ११ वाजता ते बंद करावे लागेल. नवीन किरकोळ व्यापार धोरणात ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकाने २४ तास उघडी ठेवता येणार नाहीत.
मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त जाहीर झालेल्या या धोरणात दुकान वर्षभर ३६५ दिवस सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे, पण दुकानातील नोकरांना साप्ताहिक सुटी ही द्यावीच लागेल. महिला कर्मचाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामावर ठेवता येईल पण त्यांच्या सुरक्षिततेची हमी दुकानदाराला द्यावी लागेल. आणखी उशिरापर्यंत त्या कामावर राहिल्यास त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्थादेखील करावी लागेल. रात्रपाळीमध्ये काम करायचे की नाही याचे निर्णय स्वातंत्र्य त्या कर्मचारी महिलेचे असेल.